The गडविश्व
ता. प्र / सावली, १ एप्रिल : तालुक्यातील बोरमाळा येथे घराच्या बाजूला शौचास गेलेल्या चार वर्षीय हर्षद संजय करमेंगे या बालकास बिबट्याने उचलून नेऊन ठार केल्याची घटना २९ मार्च रोजी घडली. सदर घटनेची माहिती गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांना माहिती होताच त्यांनी कारमेंगे परिवाराला सांत्वनपर भेट दिली. दरम्यान नरभक्षक बिबट्याला पकडण्याचे निर्देश दिले तर वन विभागाकडून मृतक बालकाच्या कुटुंबाला पाच लक्ष रुपयांचा धनादेश खासदार अशोक नेते यांच्या हस्ते देण्यात आला. जंगला लगत असलेल्या गावाचे हिंस्र पशु पासून संरक्षण करण्याकरिता उपाययोजना कराव्यात असे राज्याचे वनमंत्री यांना भ्रमणध्वनीद्वारे खासदारांनी सांगितले. गावातील समस्या ऐकून त्या लवकरात लवकर सोडविण्यात येतील असे आश्वासन दिले.
यावेळी तालुकाध्यक्ष अविनाश पाल, तालुका महामंत्री सतीश बोम्मावार, महिला आघाडीच्या उपाध्यक्ष प्रतिभा बोभाटे, सरपंच भोजराज धारणे, गेवराचे सरपंच मोहन चन्नावार, निखिल सुरमवार, जगदीश हेटकर, पद्माकर इंगोले सावलीचे नायब तहसीलदार कांबळे, वनपरिक्षेत्र अधिकारी विरुडकर, पाथरीचे ठाणेदार मोहोळ, क्षेत्र सहायक राजू कोडापे व वन विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (The gdv) (Muktipath) (Chandrpur News Updates) (Game of Thrones) (Lucknow Super Giants) ( Man City) (Bihar Board 10th Result 2023) (JioCinema) (Tata ipl 2023) (Police-Naxal encounter broke out in Gadchiroli