– राज्यपालांना विधेयक रद्द करण्याची मागणी, जिल्हाधिकाऱ्यामार्फत निवेदन सादर
The गडविश्व
गडचिरोली, दि. १९ : राज्य सरकारने सादर केलेल्या व वादग्रस्त ठरलेल्या ‘महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक २०२४’ विरोधात गडचिरोली जिल्हा काँग्रेसने तीव्र आंदोलन छेडले. विधेयकाचे प्रतिकात्मक दहन करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. तसेच सदर विधेयक रद्द करण्याची मागणी करत राज्यपालांना जिल्हाधिकाऱ्यामार्फत निवेदन सादर करण्यात आले.
या विधेयकामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य, वैयक्तिक गोपनीयता आणि नागरी हक्कांवर गदा येणार असल्याचा काँग्रेसचा आरोप आहे. आदिवासीबहुल, संवेदनशील आणि मागास जिल्ह्यांवर यामुळे पोलीस दडपशाही वाढेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. “हे विधेयक लोकशाहीच्या मूळ तत्वांना बाधा पोहोचवते. त्यामुळे याचा तीव्र निषेध करतो आणि रद्द करण्याची मागणी करतो,” असे जिल्हा काँग्रेसने स्पष्ट केले.
या आंदोलनात जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, माजी जिप उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, महिला अध्यक्षा अॅड. कविता मोहरकर, शहराध्यक्ष सतीश विधाते, तसेच तालुका अध्यक्ष, विविध सेल प्रमुख, महिला व युवक काँग्रेसचे पदाधिकारी, माजी लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी विधेयकाची होळी करून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. जनतेच्या मूलभूत अधिकारांचे रक्षण करण्यासाठी काँग्रेसचे हे आंदोलन असून, राज्य शासनाने विधेयक मागे घेतले नाही, तर लढा अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #Gadchiroli #CongressProtest #JanSurakshaBill #DemocracyUnderThreat #MaharashtraPolitics #FreedomOfSpeech #CivilRights #ConstitutionalRights #BurnTheBill #PeopleVsBill #PoliticalProtest #DistrictCollector #GadchiroliCongress #SayNoToSuppression #StopJanSurakshaBill #गडचिरोली #जनसुरक्षा_विधेयक #काँग्रेस_आंदोलन #लोकशाही_वाचवा #संविधान_हक्क #विधेयकाची_होळी #जनतेचा_आवाज #स्वातंत्र्यावर_गदा #दडपशाही_विरोधात #न्यायाची_लढाई #गडचिरोली_काँग्रेस #राज्यपालांना_निवेदन #नागरिक_हक्क #महाराष्ट्र_राजकारण #कायदा_विरोधात_आंदोलन
