The गडविश्व
गडचिरोली, दि. ०५ : गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने ०५ मार्च रोजी जिल्ह्यातील शेतकरी, महिला, युवक व सर्वसामान्य नागरिकांच्या विविध समस्यांना घेऊन जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वात भव्य धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी धरणे आंदोलनातून शासकीय धान खरेदी केंद्रात विक्री करणाऱ्या शेतकऱ्याना तातडीने धानाचे चुकारे देण्यात यावे.शेतकऱ्यांना सोलरकृषी पंप compulsory न करता त्यांना विद्युत कृषी पंप चा पर्याय देण्यात यावा.शेतीकरिता देण्यात येणाऱ्या विद्युत चा व्होलटेज वाढवून, सद्या सुरु असलेल्या लोड शेडींग च्या वेळेचे योग्य नियोजन करण्यात यावे. वनपट्टे धारकांचे प्रलंबित दावे निकाली काढून वनपटे वितरित करण्यात यावे. गडचिरोली येते होणाऱ्या विमानतळाकरीता सुपीक जमिन अधिग्रहित न करता त्यासाठी इतर शासकीय किंवा वनजमिनीचा वापर करण्यात यावा. घरकुल लाभार्त्याना जागा उपलब्ध नसल्यास शासन स्तरावरून जागा उपलब्ध करून देऊन त्यांना प्रापर्टी कार्ड सहित घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा. रोजगार हमी योजना, घरकुल सारख्या विविध योजनातील थकीत असलेले अनुदान लाभार्थ्याना त्वरित देण्यात यावे. जिल्ह्यातील महिलांवरील वाढत्या अत्याच्यावर आढा घालण्यासाठी व महिलांच्या सुरक्षा साठी कठोर व्यवस्था उभारण्यात यावी. रानटी जनावरांचे हल्ले वाढत असून त्यावर प्रभावी उपाययोजना करण्यात यावी, व हल्यातील जखमी व नुकसान ग्रस्ताना ताडीने भरपाई देण्यात यावी. सुरजागड येथे चालणाऱ्या जड वाहतूकीमुळे अपघात व प्रदूषनाचे प्रमाण वाढत चालले असून त्यामुळे स्थानिक नागरिकांना दैनंदिन जीवनात नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने त्यावर प्रभावी उपाय करण्यात यावे. राष्ट्रीय व राज्य महामार्गची तातडिने दुरुस्ती करण्यात यावी. जिल्ह्याला अतीरिक्त नव्या बसेस देण्यात याव्या. जिल्ह्यातील शासकीय कार्यालयातील रिक्त पदाची तातडीने भरती करण्यात यावी. जिल्ह्यात सुरु होणाऱ्या प्रकलपात स्थानिक तरुणांकरीता 50 टक्या पेक्षा अधिक जागा आरक्षित करून त्यांना प्राधान्य देण्यात यावे. राज्याचे मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र जी फडणवीस यांनी महिन्यातून किमान 2 दिवस जिल्ह्यासाठी देऊन जिल्ह्यातील जनतेच्या समस्या ऐकून घ्याव्यात. यासह विविध मागण्यांना घेऊन, धरने आंदोलन करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव पंकज गुड्डेवार, प्रदेश सचिव रवींद्र दरेकर, जि. प. माजी उपाध्यक्ष मनोहर पा. पोरेटी, युवक काँग्रेस प्रदेश सचिव ऍड. विश्व्जीत कोवासे, शहर अध्यक्ष सतीश विधाते, तालुकाध्यक्ष वसंत राऊत, मिलिंद खोब्रागडे, प्रमोद भगत, राजेंद्र बुल्ले, जिल्हा उपाध्यक्ष शँकरराव सालोटकर, अनिल कोठारे, नेताजी गावतुरे, प्रभाकर वासेकर, सेल अध्यक्ष राजेश ठाकूर, भूपेश कोलते, दत्तात्र्यय खरवडे, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष नितेश राठोड, घनश्याम वाढई, काशीनाथ भडके, सुनील चडगुलवार, माजी नगरसेवक रमेश चौधरी, नंदुभाऊ वाईलकर, हरबाजी मोरे, शेतकरी नेते श्यामजी मस्के, माधव गावळ, राजाराम ठाकरे, उत्तम ठाकरे, पिंकूभाऊ बावणे, ढिवरू मेश्राम, दिवाकर निसार, देवेंद्र ब्राम्हणवाडे, शालिनीताई पेंदाम, कविताताई उराडे, गौरव येनप्रेड्डीवार ,विपुल येलटीवार, कुणाल ताजने, प्रफुल आंबोरकर, उत्तम ठाकरे, जितेंद्र मुनघाटे, प्रतीक बारसिंगे, जितेंद्र मुप्पीडवार, मनोज उंदीरवाडे, हेमंत मोहितकर, जावेद खान, स्वप्नील बेहरे, मिलिंद बारसागडे, रवी यामलकुर्तीवार, पुरोषोत्तम भाऊ,राजूदादा परसे, भूषण भैसारे, सुदर्शन उंदीरवाडे, पुष्पराज उंदिरवाडे, हेमंत भांडेकर, हेमंत कोवासे, तुळशीराम बारसिंगे, मिलिंद बागेसर,भाऊरावजी रामटेके, अशोक भाऊ,आनंद वासनिक, विलास राऊत, खुशाल मेश्राम, देवाजी झाडे,शालिकराम पत्रे, जयेंद्र पेंदाम, भावराव मडावी, मनोहर कुमरे, दिवाकर नारनवरे, बंडोपत भाऊ,मंगेश कुणघाडकर, कुणाल आभारे, सुधाकर मेश्राम, मारोती रामटेके, परशुराम मुनघाटे, गुरूदार क्षीरसागर, ताराचंद मेश्राम, संतोष तुलावी, चंद्रशेखर टेंभुर्णे, विश्वनाथ वरखडे सह काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकारी, शेतकरी बांधव उपस्थित होते.
