The गडविश्व
ता. प्र/ धानोरा, दि. १० : ११३ बटालियन केंद्रीय राखीव पोलीस दल, धानोरा यांच्या वतीने ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ कार्यक्रमाअंतर्गत सोडे येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रम शाळेत मुलींसाठी मूलभूत संगणक प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले. जसवीर सिंह, कमांडंट ११३ बटालियन यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे प्रदीप कुमार त्रिपाठी, द्वितीय कमांडंट, ११३ बटालियन यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी इयत्ता ५ वी ते १० वीतील सुमारे ७० विद्यार्थिनींना संगणकाची मूलभूत माहिती दिली. संगणकाचे महत्त्व, विज्ञान, व्यवसाय, शिक्षण, मनोरंजन अशा विविध क्षेत्रातील त्याचा वापर तसेच भविष्यातील रोजगाराच्या संधींचा त्यांनी सविस्तर ऊहापोह केला. संगणकामुळे वेळ, श्रम आणि पैशांची बचत होत असून अचूकता वाढते, हेही त्यांनी अधोरेखित केले.
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थिनींनी सीआरपीएफचे मनःपूर्वक आभार मानले. यावेळी एस.आर. मंडलवार, मुख्याध्यापक, शिक्षक व शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमानंतर अल्पोपहाराचेही आयोजन करण्यात आले.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice
