कुरखेडा च्या सती नदीवरील पुलाचे काम ४५ दिवसांत पूर्ण करा : जिल्हाधिकारी पंडा यांचा अल्टिमेटम

11

– पूरग्रस्त शेतकरी, आरोग्य सुविधा आणि मलेरिया प्रतिबंधासाठी तातडीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश
The गडविश्व
गडचिरोली, दि.१४ : कुरखेडा तालुक्यातील सती नदीवरील राष्ट्रीय महामार्गावरील पूल लवकरात लवकर वाहतुकीसाठी खुला व्हावा, यासाठी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी संबंधित यंत्रणांना ४५ दिवसांची अंतिम मुदत देत तातडीने काम पूर्ण करण्याचे स्पष्ट आदेश दिले. आज कुरखेडा दौऱ्यावर असताना त्यांनी पुलाची पाहणी केली आणि कामातील दिरंगाईबाबत नाराजी व्यक्त केली.
यावेळी प्रभारी उपविभागीय अधिकारी प्रशांत गड्डम, तहसीलदार राजकुमार धनबाते, गटविकास अधिकारी आणि आरोग्य, कृषी, बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी अलीकडील अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीचा आढावा घेतला. तहसीलदार धनबाते यांनी ४०७ शेतकऱ्यांच्या १५० हेक्टर शेतीचे नुकसान झाल्याची माहिती दिली. जिल्हाधिकारी पंडा यांनी नुकसानीच्या पंचनामे तातडीने पूर्ण करून शासकीय मदतीचे प्रस्ताव त्वरीत सादर करण्याचे आदेश दिले.

डायलिसिस युनिट त्वरीत सुरू करा – हिंद लॅबवर नाराजी

कुरखेडा येथील उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी करताना जिल्हाधिकाऱ्यांनी डायलिसिस युनिट अद्याप सुरू न झाल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. संबंधित संस्थेला विलंबाबाबत तक्रार नोंदवण्याचे आदेश देत हे युनिट तात्काळ कार्यान्वित करण्याचे निर्देश त्यांनी दिले. यासह रुग्णालयातील अपूर्ण विद्युतीकरणाचे काम देखील लवकरात लवकर पूर्ण करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मलेरिया रोखण्यासाठी घरोघरी तपासणी व फवारणीचे आदेश

मान्सूनमुळे मलेरिया आणि साथीच्या रोगांचा धोका लक्षात घेता, आरोग्य विभागाने गावपातळीवर युद्धपातळीवर उपाययोजना राबवाव्यात, असे निर्देश देण्यात आले. गावोगावी आरोग्य पथकांनी घरोघरी जाऊन तापाचे रुग्ण शोधावेत, रक्तनमुने घ्यावेत आणि संशयितांवर तत्काळ उपचार सुरू करावेत. मलेरिया प्रतिबंधक फवारणी, गप्पी मासे सोडणे आणि जनजागृती मोहिमा तातडीने राबविण्याचे आदेशही देण्यात आले.
बैठकीस महसूल, पोलीस, वन, आरोग्य, कृषी आणि अन्य संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

#thegadvishva #thegdv #gadchirolinews #gadchirolipolice #Gadchiroli #Kurkheda #SatiRiverBridge #CollectorAvishantPanda #FloodAffectedFarmers #DialysisUnit #MalariaPrevention #HealthDepartment #DisasterManagement #GovernmentSchemes #InfrastructureDevelopment #MarathiNews #MaharashtraNews #DistrictAdministration #RuralDevelopment
#गडचिरोली #कुरखेडा #सतीनदीपूल #जिल्हाधिकारीअविश्यांतपंडा #पूरग्रस्तशेतकरी #आरोग्यविभाग #डायलिसिसयुनिट #मलेरियाप्रतिबंध #महसूलविभाग #शासकीयनियोजन #आपत्तीव्यवस्थापन #गडचिरोलीबातमी #मराठीबातमी #विकासकामे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here