– मंत्री भुसे जाताच झाली हाणामारी
The गडविश्व
गडचिरोली, दि. ७ : शिवसेना (शिंदे गट)मध्ये अंतर्गत संघर्षाचा भडका आज गडचिरोलीत उडाला. सत्ताधारी पक्षाच्या दोन प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये थेट सर्किट हाऊसच्या आवारात हाणामारी झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या गडचिरोली दौऱ्यानंतर जिल्ह्यातील सर्किट हाऊसवर ही घटना घडली. मंत्री भुसे यांच्या बैठकीनंतर काही वेळातच गडचिरोली जिल्हाप्रमुख संदीप ठाकूर आणि अहेरी जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे यांच्यात श्रेयवादावरून तीव्र वाद झाला. बाचाबाची झटापटीत परिवर्तीत झाली आणि काही क्षणातच दोघांनी एकमेकांवर हात उचलल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
या प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत असून, शिंदे गटातील अंतर्गत गटबाजी आणि कुरघोडीचे राजकारण सर्वसामान्यांपुढे उघड झाले आहे. घटनेनंतर पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थतेचे वातावरण आहे. गटात एकवटण्याऐवजी आपापसातील स्पर्धा, वर्चस्ववाद आणि स्थानिक नेतृत्वातील तणाव पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
या प्रकरणावर अद्याप पोलिसांकडून कोणतीही अधिकृत कारवाई झालेली नाही अशी माहिती असून तसेच पक्षाकडूनही कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. मात्र, या प्रकारामुळे सत्ताधारी पक्षाच्या शिस्तीवर आणि प्रतिमेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही घटना शिंदे गटासाठी अडचणीची ठरू शकते, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolinews #ShivSenaShindeFaction #GadchiroliClash #PoliticalRift #DistrictChiefFight #ShindeGroupTensions #SarkariNews #InternalPolitics #MaharashtraPolitics #CircuitHouseClash #ViralVideo #PartyDispute #LeadershipCrisis #DadaBhusheVisit
#शिंदेगट #गडचिरोलीविवाद #राजकीयसंघर्ष #जिल्हाप्रमुखहाणामारी #सर्किटहाऊसगोंधळ #शिवसेना_शिंदेगट #अंतर्गतगटबाजी #महाराष्ट्रराजकारण #पक्षातीलवाद #शिस्तभंग #श्रेयवाद #गडचिरोलीबातमी #व्हायरलव्हिडीओ
