“नगर रणांगण – २०२५” : जनतेच्या प्रश्नांचं रणांगण सजलं!

60

“नगर रणांगण – २०२५” : जनतेच्या प्रश्नांचं रणांगण सजलं!
– “शहराच्या समस्या – तुमच्याच शब्दांत, आमच्या बातम्यांत
The गडविश्व
गडचिरोली / विशेष प्रतिनिधी, दि. ०५ : आगामी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या खऱ्या प्रश्नांना आवाज देण्यासाठी ‘The गडविश्व’ ( आवाज तुमचे, शब्द आमचे) घेऊन येत आहे एक वेगळं आणि प्रभावी अभियान – “नगर रणांगण – २०२५”!

शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, आरोग्यसेवा, शिक्षण, कर आकारणी आणि भ्रष्टाचार या नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित विषयांवर या विशेष मालिकेत सखोल बातम्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. प्रत्येक प्रभागातील नागरिकांचा आक्रोश, अपूर्ण कामांबद्दलचे प्रश्न आणि प्रशासनाकडून अपेक्षित उत्तरं – हे सर्व ‘नगर रणांगण’ मालिकेतून जनतेसमोर आणले जाणार आहे.

ही थेट भेट किंवा संवादाची मालिका नसून, आपल्या परिसरातील प्रश्न आणि समस्या आपल्याच माध्यमातून बातमी स्वरूपात प्रकाशित होणार आहेत.
त्यामुळे आपल्या भागातील समस्या, अपूर्ण कामांचे फोटो वा व्हिडिओ आणि थोडक्यात माहिती व्हॉट्सॲपवर पाठवा – आणि आपला आवाज पोहोचवा थेट जनतेपर्यंत!

संपर्कासाठी : चेतन गहाणे (जिल्हा प्रतिनिधी) – 9168436285
स्वाधिनता बाळेकरमकर – 8975134748, The गडविश्व Official – 7588432144
(टीप : समस्या संबंधित फोटो, व्हिडिओ आणि संपूर्ण माहिती व्हॉट्सॲप वर पाठवावी.)

“प्रश्नांचा हिशोब – उत्तरांची वेळ आता आलीय!”

“नगर रणांगण – २०२५” मध्ये पाहा, ऐका आणि वाचा – कारण यावेळी मुद्देच ठरवणार नगराचं भविष्य!

#thegadvishva #thegdv #gadchirolinews #gadchirolipolice #NagarRanang2025 #CitizenVoice #UrbanIssues #MunicipalElection2025 #PublicAwareness #CityDevelopment #TheGadVishva #LocalJournalism #PeopleSpeak #Accountability #नगररणांगण२०२५ #लोकआवाज #नगरपरिषदनिवडणूक #जनतेचाबोलबाला #जनआवाज #शहरविकास

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here