चिचटोला शाळेत पंचारती, पुष्पवृष्टी आणि भेटवस्तूंनी नव्या सत्राचे उत्साहात स्वागत

20

The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. २४ : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, चिचटोला येथे २०२५-२६ या शैक्षणिक सत्राचा पहिला दिवस अत्यंत उत्साहात आणि आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला. शाळा परिसर, वर्गखोल्या आणि प्रांगण आकर्षक सजावटीने उजळून निघाले होते. नव्या शैक्षणिक प्रवासाला सुरुवात करताना विद्यार्थ्यांचे स्वागत पारंपरिक आणि भावनिक पद्धतीने करण्यात आले.
प्रत्येक विद्यार्थ्यांचे पंचारती ओवाळणी, फुलांचा वर्षाव, पुष्पगुच्छ, तसेच छोट्या भेटवस्तू देऊन मनोभावे स्वागत करण्यात आले. नव्याने दाखल झालेल्या बालचमूंना शिक्षकांनी तोंड गोड करत स्नेहपूर्वक अभिनंदन केले.
या सोहळ्यात मुख्याध्यापिका सहारे मॅडम, शाळा व्यवस्थापक माधव सिंद्राम, ग्रामपंचायत सदस्य रामसाय मडावी, पोलिस पाटील हरीचंद कोराम, युवा संघर्ष संघटनेचे अतुल सिद्राम, तसेच इतर सामाजिक कार्यकर्ते, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या उपस्थितीत आणि सहकार्याने झालेल्या या स्वागताने विद्यार्थ्यांमध्ये नव्या सत्रासाठी नवा जोम आणि आत्मविश्वास निर्माण झाला.
शाळेतील शिक्षक, पालक आणि गावकऱ्यांनी मिळून हा शाळा प्रवेशोत्सव एक आनंददायी आठवण ठरेल असा आत्मीयतेने साजरा केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here