रांगी कबड्डी क्रीडा स्पर्धेत छत्तीसगडच्या ढोकळा संघाचा विजेतेपदावर कब्जा
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. ०८ : आदर्श नवयुवक क्रीडा मंडळ, रांगी यांच्या वतीने आयोजित चार दिवसीय क्रीडा संमेलनाचा समारोप उत्साहात पार पडला. या स्पर्धेतील कबड्डी स्पर्धेत छत्तीसगड राज्यातील ढोकळा संघाने शानदार खेळ करत विजेतेपद पटकावले, तर खेडी संघ उपविजेता ठरला. विजेत्या संघाला ३०,००० व उपविजेत्या संघाला २५,००० चे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
बक्षीस वितरण समारंभात शशिकांत साळवे, अध्यक्ष कृषी उत्पन्न बाजार समिती, गडचिरोली यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक देण्यात आले. कार्यक्रमास सौ. फालेश्वरी गेडाम (सरपंच ग्रामपंचायत रांगी), नरेंद्र भुरसे (माजी उपसरपंच), तुळशीराम भुरसे (तंटामुक्त समिती अध्यक्ष), देवनाथ पुळो, जीवनदास उसेंडी, जगदीश कन्नाके, देवराव कुनघाडकर, जयंत महाराज काटेंगे, दिलिप महाराज काटेंगे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक साहिल कुमोटी, संचालन हेमंत काटेंगे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रदीप गेडाम यांनी मानले.
या वेळी मंडळाचे अध्यक्ष कुलदीप पदा, तसेच अजय गेडाम, विलास मडावी, गोविंद बैस, कैलास मडावी, प्रवीण गेडाम, पराग देशपांडे, गणराज कोंगाटकर यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रांगी ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागामुळे क्रीडा संमेलन यशस्वी ठरले असून, तरुणांच्या क्रीडा प्रतिभेला योग्य व्यासपीठ मिळाल्याचे समाधान आयोजकांनी व्यक्त केले.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #gadchirolipolice














