The गडविश्व
मुंबई, दि. ०४ : याराज्यातील जिल्हा परिषद शाळांमधील अनुसूचित जमातीच्या नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण महोत्सवी आदिवासी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजनेऐवजी आता केंद्र सरकारची पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना लागू होणार आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयाला मान्यता देण्यात आली. या बैठकीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अध्यक्षस्थानी होते.
मागील राज्य योजनेच्या तुलनेत केंद्राच्या शिष्यवृत्ती योजनेत विद्यार्थ्यांना अधिक आर्थिक लाभ मिळतो. त्यामुळे अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांना थेट फायदा होणार आहे. शासकीय वसतीगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना केंद्र योजनेतील लाभ वजा करून उर्वरित रक्कम वसतीगृह योजनेतून दिली जाणार आहे.
ही शिष्यवृत्ती योजना जिल्हा परिषद शाळांतील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना लागू राहणार असून, अनुदानित व शासकीय निवासी आश्रमशाळा, एकलव्य निवासी शाळा तसेच नामांकित शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मात्र या योजनेचा लाभ मिळणार नाही.
या निर्णयामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रोत्साहन मिळून त्यांच्या शिक्षणाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #शिष्यवृत्ती #अनुसूचितजमात #विद्यार्थी #मंत्रिमंडळनिर्णय #शिक्षण #केंद्रसरकारयोजना #महाराष्ट्रबातमी #STStudents #ScholarshipScheme #EducationNews














