– कर्करोग तज्ञ डॉ. सुशील मानधनिया करणार उपचार
The गडविश्व
गडचिरोली,१६ मार्च : चातगाव येथील सर्च रुग्णालयात कॅन्सरची ओपीडी सुरू करण्यात आली आहे. फेब्रुवारी महिन्यात झालेल्या शिबिराला रुग्णांचा उत्तम प्रतिसाद मिळाला . आता पुन्हा १६ मार्चला कर्करोग ओपीडी आयोजीत केली आहे.
आपल्या सर्वांना माहित आहे की कर्करोग हा एक धोकादायक आजार आहे आणि तो विविध कारणांमुळे विविध प्रकारचा असू शकतो. कॅन्सर फक्त तंबाखू खाणाऱ्या किंवा चघळणाऱ्यां मध्येच होतो असे नाही तर हा आजार आता स्तनाचा कर्करोग, पोटाचा कर्करोग, त्वचेचा कर्करोग आणि इतर अनेक प्रकारांमध्ये दिसून येतो. स्तनाचा रंग बदलणे, स्तन लटकणे, गाठ येणे किंवा आकार बदलणे ही सर्व स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे आहेत. त्याचप्रमाणे श्वास लागणे, अशक्तपणा आणि थकवा जाणवणे, स्नायू आणि हाडे दुखणे ही सर्व फुफ्फुसाच्या कर्करोगाची लक्षणे आहेत. म्हणूनच कोणत्याही संकोच न करता तुमच्या समस्येची सखोल तपासणी करण्यासाठी डॉक्टरांकडे जाणे खूप महत्वाचे आहे. सर्च येथील दवाखान्यात १६ मार्चला कर्करोग ओपीडी घेण्यात येणार आहे. या सेवांची गरज असलेल्या समाजातील प्रत्येक सदस्याने माँ दंन्तेश्वरी रुग्णालयात येऊन या नवीन सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. हि ओपीडी सेवा नागपुरचे प्रसिद्ध तज्ञ डॉ. सुशील मांनधनिया पुरवतील.

(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (Muktipath) (Chandrpur News Updates) (GPT-4) (Bihar Board 12th Result 2023) (Poco X5 5G) (Sameer Khakhar) ( Imran Khan) (Lawrence Bishnoi) (Adani Enterprises) ( Northern Lights) (Inter Milan)