गडचिरोली खनिज विकास प्राधिकरण रद्द करा – शेतकरी कामगार पक्षाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

102

– आदिवासी संस्कृतीच्या विध्वंसाचा आरोप; जनसुरक्षा विधेयकाचाही निषेध
The गडविश्व
गडचिरोली, दि. ३० : गडचिरोली जिल्ह्यात माडिया गोंड आदिवासींच्या परंपरागत हक्कांना पायदळी तुडवत खनिज संपत्तीची खुलेआम लूट करण्यासाठी स्थापन करण्यात येणाऱ्या जिल्हा खनिज विकास प्राधिकरणाच्या विधेयकाचा शेतकरी कामगार पक्षाने तीव्र शब्दांत निषेध केला असून, सदर विधेयक तातडीने रद्द करण्याची मागणी मुख्यमंत्री यांच्याकडे करण्यात आली आहे.
शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस रामदास जराते, खजिनदार भाई शामसुंदर उराडे, महिला नेत्या जयश्रीताई वेळदा, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष अभिलाषा मंडोगडे, तालुका चिटणीस चंद्रकांत भोयर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करत आपला विरोध नोंदवला.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, गडचिरोली जिल्हा संविधानाच्या पाचव्या अनुसूची अंतर्गत संरक्षित असलेला असून, येथील माडिया गोंड आदिवासींचे पारंपरिक व संवैधानिक अधिकार असताना देखील त्यांची संस्कृती, रितीरिवाज, व नैसर्गिक संसाधनांना धक्का पोहोचवणारे लोहखाण प्रकल्प आणले जात आहेत. हा संपूर्ण प्रकार आदिवासींच्या विरोधात द्रोह निर्माण करणारा आहे, असा आरोप करण्यात आला आहे.
तसेच, जिल्ह्यातील खाणी, जबरदस्तीचे भू-अधिग्रहण आणि प्रकल्पांविरोधात आवाज उठवणाऱ्या कार्यकर्त्यांचा छळ करण्यासाठी महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयकाचा गैरवापर होऊ शकतो, असा इशाराही शेतकरी कामगार पक्षाने दिला असून तेही विधेयक तातडीने मागे घेण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.

#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolinews #गडचिरोली #खनिजप्राधिकरण #शेतकरीकामगारपक्ष #आदिवासीहक्क #माडियागोंड #खनिजलूट #संविधानपाचवीअनुसूची #जिल्हाधिकारीनिवेदन #मुख्यमंत्र्यांकडेमागणी #जनसुरक्षाविधेयक #भूअधिग्रहणविरोध #लोकशक्ती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here