The गडविश्व
गडचिरोली, दि.१९ :पंतप्रधान रोजगार आणि कौशल्य विकास अंतर्गत पंतप्रधान इंटर्नशिप योजना ( PMIS ) कार्यान्वित करण्यांत आली. तरूणांना रोजगारक्षम बनवणे हा योजनेचा मुख्य उददेश आहे.
या योजनेची पात्रता निकष शिक्षण किंवा रोजगारात नसलेले बेरोजगार तरूण कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रू.8 लाखांपेक्षा जास्त नसावे किंवा कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत नसावा. उमेदवारांचे वय 21 ते 24 असावे.
ऑनलाईन पोर्टल आणि व्यवस्थापन कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने (MCA) योजनेच्या व्यवस्थापनासाठी https://pminternship.mca.gov.in/ हे विशेष ऑनलाईन पोर्टल विकसित केले आहे. या पोर्टलद्वारे कंपन्या आणि तरुणांना नोंदणी करण्याची व एकमेकांशी जोडले जाण्याची संधी मिळेल. तसेच, सरकार द्वारे थेट लाभ हस्तांतरण (DBT) प्रणालीद्वारे आर्थिक सहाय्य वितरित केले जाईल.
अर्ज करण्याची अंतिम तारीख, उमेदवार ३१ मार्च 2025 पर्यंत या संधीसाठी अर्ज करू शकतात. त्यानंतर पोर्टल उमेदवारांच्या प्रोफाइलनुसार संधी जुळवेल आणि कंपन्यांना निवडलेल्या अर्जाचीमाहिती पाठवेल. उमेदवारांना विविध उद्यो गांमध्ये अनुभव घेण्याची संधी मिळेल.

यूट्यूब मार्गदर्शन व्हिडिओज
प्रोफाइल पूर्ण करण्यासाठीः
English:
Hindi:
इंटर्नशिपसाठी अर्ज करण्यासाठी :
English :
Hindi : https://youtu.be/apeg14TM0Pk?si=n qjRoHubeS911kD
संपर्क अधिकारी (महाराष्ट्र आणि गोवा), संतोषकुमार प्रादेशिक संचालक (Western Region). MCA-9958775889, नोडल अधिकारी (महाराष्ट्र आणि गोवा)
अपर्णा मुडियम, ICLS, उपसंचालक, MCA (Western Region) 9013276366, ऋजुता बनकर, ICLS, सहाय्यक संचालक, MCA (Western Region) 9665314145
सोशल मीडिया हॅडल्स, फेसबुक: facebook.com/MCA2 India
ट्विटर: twitter.com/MCA21India
इस्टाग्राम: instagram.com/mca2lindia
यूट्यूब: www.youtube.com@MCA21India
ही योजना बेरोजगार तरुणांना रोजगारक्षम बनवण्यासाठी मोठी संधी आहे इच्छुक उमेदवारांनी ३१ मार्च 2025 च्या आत अर्ज करावा. अधिक माहितीकरिता जिल्हा कौशल्य् विकास रोजगार, व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय संकुल बॅरेक क्र.-2 युनिट क्रमांक-2 कॉम्प्लेक्स, पोलीस मुख्यालया समोर, गडचिरोली या कार्यालयाशी संपर्क करावा. असे सहायक आयुक्त् जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली यांनी कळविले आहे.