भाजपचा गड ढासळला : पेंढरी, गट्टा परिसरातील शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये भव्य प्रवेश

115

– भाजपच्या कार्यशैलीवर नाराजी ; काँग्रेसच्या विचारधारेवर विश्वास ठेवत धानोरा तालुक्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल
The गडविश्व
गडचिरोली, दि.२३ : धानोरा तालुक्यातील पेंढरी, गट्टा व परिसरातील भाजपचे शेकडो पदाधिकारी, सरपंच, ग्रामसभा अध्यक्ष, युवक व महिला कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये एकत्रित प्रवेश करून भाजपला मोठा धक्का दिला आहे. काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे व आमदार रामदासजी मसराम यांच्या उपस्थितीत गडचिरोली येथे झालेल्या भव्य कार्यक्रमात या नवोदित कार्यकर्त्यांनी काँग्रेसचा झेंडा हाती घेतला.
यावेळी काँग्रेस पक्षाचे दुपट्टे व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या पक्षप्रवेशामध्ये दुर्गापूर, झाडापापडा, कामतडा, सावंगा आदी गावांतील निवडून आलेले सरपंच, तसेच शेकडो तरुण आणि महिलांचा मोठा सहभाग होता.
भाजपच्या कार्यशैलीवर नाराजी, स्थानिक प्रश्नांवरील दुर्लक्ष, वाढती महागाई, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या अडचणी यामुळे या कार्यकर्त्यांनी भाजपचा त्याग करत काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. “भाजपमध्ये सामान्य कार्यकर्त्यांचे ऐकले जात नाही, जिल्ह्याच्या समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहेत,” अशी स्पष्ट भावना या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
प्रवेशकर्त्यांमध्ये परमेश्वर गावडे (सरपंच, दुर्गापूर), देवसाय गावडे (सरपंच, कामतडा), कांडेराम उसेंडी (सरपंच, झाडापापडा), माणिक हिचामी (ग्रामसभा अध्यक्ष, सावंगा), अरविंद मडावी, हिरामण गावडे, विशाल नरोटे, पल्लवी गावडे, गीता गावडे, योगिता मडावी, व अनेक अनुभवी व नवतरुण कार्यकर्त्यांचा समावेश.
“हे सर्व कार्यकर्ते काँग्रेसच्या विचारसरणीवर विश्वास ठेवून पक्षात दाखल झाले असून, ते संघटनेला अधिक बळकट करतील,” असा विश्वास काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी व्यक्त केला. या प्रसंगी जिल्हा व तालुका पातळीवरील विविध सेलचे प्रमुख, माजी पदाधिकारी व काँग्रेस नेते उपस्थित होते.
नवोदित कार्यकर्त्यांनी पक्षासाठी निष्ठेने व संघर्षशीलतेने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. या ऐतिहासिक पक्षप्रवेशामुळे काँग्रेसने धानोरा तालुक्यात आपली ताकद लक्षणीयपणे वाढवली असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घडामोडीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

##thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #PoliticalShift #BJPtoCongress #MassJoining #GadchiroliPolitics #CongressStrengthens #PartySwitch #GrassrootsPolitics #MaharashtraPolitics #YouthAndWomenInPolitics #LeadershipChange
#गडचिरोली_राजकारण #पक्षप्रवेश_लाट #CongressWave #BJPToCongress #धानोरा_राजकीयघटना #राजकीयघटने #भाजपतेकाँग्रेस #पक्षप्रवेश #गडचिरोलीराजकारण #धानोरातीलराजकीयभूकंप #तरुणआणिमहिलांचीएकजूट #काँग्रेसचीबळकटी #राजकीयपरिवर्तन #भाजपमधूननाराजी #काँग्रेसमध्येनवचैतन्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here