The गडविश्व
मुंबई, दि. ४ : संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्यात तब्बल हजार रुपयांची वाढ करण्याचा महत्त्वाचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.
यामुळे आतापर्यंत दरमहा दीड हजार रुपये मिळणाऱ्या लाभार्थ्यांना आता अडीच हजार रुपये अर्थसहाय्य मिळणार आहे. या वाढीचा लाभ संजय गांधी निराधार योजनेतील सुमारे ४ लाख ५० हजार ७०० तसेच श्रावणबाळ योजनेतील २४ हजार ३ दिव्यांग लाभार्थ्यांना होणार आहे.
ही वाढ ऑक्टोबर २०२५ पासून लागू होणार असून, यासाठी शासनाने ५७० कोटी रुपयांची तरतूद मंजूर केली आहे. निराधार पुरुष, महिला, विधवा, अनाथ मुले तसेच सर्व प्रवर्गातील दिव्यांगांना या निर्णयाचा थेट लाभ मिळणार आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #संजयगांधीनिराधार #श्रावणबाळयोजना #दिव्यांग #अर्थसहाय्य #महाराष्ट्रशासन #मुख्यमंत्रीफडणवीस #मंत्रिमंडळनिर्णय #सोशलवेल्फेअर #शासनयोजना #मराठीबातमी
#SanjayGandhiNiradhar #ShravanbalScheme #DisabledWelfare #FinancialAssistance #MaharashtraGovernment #CMFadnavis #CabinetDecision #SocialWelfare #GovernmentSchemes #MarathiNews














