मोठी बातमी : ३ कोटींच्या बक्षीसाचा नक्षल नेता गजर्ला रवी चकमकीत ठार ; दोन महिला नक्षल्यांचाही खात्मा

746

The गडविश्व
सीतारामराजू, दि. १८ : आंध्रप्रदेशच्या अल्लुरी सीतारामराजू जिल्ह्यातील मारडपल्ली जंगलात आज पहाटे झालेल्या चकमकीत नक्षल चळवळीचा प्रमुख नेता गजर्ला रवी उर्फ उदय ठार झाला. त्याच्यासोबत झोनल सदस्य अरुणा उर्फ रावी व्यंकट चैतन्य आणि प्लाटून सदस्य अंजु या दोन महिला नक्षलींचाही खात्मा करण्यात आला.
तीन कोटी रुपयांच्या बक्षीसाची घोषणा करण्यात आलेला गजर्ला रवी हा आंध्र-ओडिशा बॉर्डर समितीचा सचिव व आंध्र स्पेशल झोनल समितीचा सदस्य होता. तो तेलंगणाचा रहिवासी असून छत्तीसगड, महाराष्ट्र, झारखंड, ओडिशा, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा या राज्यांतील अनेक नक्षल कारवायांचा सूत्रधार होता.
विशेष नक्षलविरोधी पथक ‘ग्रेहाउंड्स’ ने मिळालेल्या गोपनीय माहितीवरून जंगलात शोधमोहीम राबवली. सकाळच्या सुमारास नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केल्याने पोलिसांनी प्रत्युत्तर दिले आणि चकमक सुरु झाली.
ठार झालेली अरुणा ही वरिष्ठ नक्षल नेता चलपतीची पत्नी आणि आझाद म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चेरकुरी राजकुमारची बहीण होती. तिच्यावरही ५० लाखांचे बक्षीस घोषित होते. अंजूनेही छत्तीसगडमधील अबूजमाड आणि इंद्रावती नॅशनल पार्क परिसरात महत्त्वाच्या नक्षल मोहिमा चालवल्या होत्या.
या कारवाईमुळे नक्षल चळवळीला मोठा झटका बसला असून, वरिष्ठ नेते आता नव्या सुरक्षित ठिकाणांच्या शोधात असल्याचे वृत्त आहे. गेल्या काही महिन्यांपासून या भागात चकमकी वाढल्याचेही स्पष्ट झाले आहे.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #naxalencounter #नक्षलविरोधीमोहीम #गजर्लारवीठार #चकमकीतीलनक्षलवध #AndhraNaxalEncounter #AntiNaxalOperation #GreyhoundsAction #NaxalHitListDown #3CroreBountyDown #NaxalMenaceEnds #SitaramaRajuEncounter #NaxalFreeIndia #नक्षलवादखात्मा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here