मुरूमगाव येथे अस्वलाचा हल्ला ; इसम गंभीर

897

The गडविश्व
ता.प्र / धानोरा, ४ ऑगस्ट : तालुक्यातील मुरूमगाव येथील अशोक फरदीया (३७) हा तरुण शेतामध्ये काम करीत असताना अस्वलीने हल्ला केला. त्यांनी आरडा ओरड केली असता बाजूला काम करत असलेल्या नागरिकांनी तरुणाकडे धाव घेतली असता अस्वल जंगलाच्या दिशेने पळाले. मात्र या हल्ल्यात तरुण गांभीर जखमी झाला. त्याला मुरूमगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातुन ग्रामीण रुग्णालय धानोरा येथे रेफर करण्यात आले आहे. या हल्यात त्यांच्या डोक्यावर गंभीर जखम झाली त्यांना टाके लावण्यात आले सद्या त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. त्यांच्यावर रुग्णाल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश गजभे यांच्या देखरेखीत ग्रामीण रुग्णालय धानोरा येथे उपचार सुरु असून वन विभागाने यांची दखल घेऊन नुकसान भरपाई देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here