बिडीओ ला प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी बैठक घेऊन लोकांच्या तक्रारींचे करावे लागेल निराकरण

260

– ग्रामविकास विभागाचा निर्णय
The गडविश्व
गडचिरोली, २ मार्च : सर्वसामान्य लोकांच्या तक्रारींचे निराकरण करण्याच्या अनुषंगाने राज्यातील सर्व जिल्हयातील सर्व तालुक्यात लोकांच्या तक्रारी,गाऱ्हाणी,अडचणी सोडवणूक करण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी सकाळी ११.०० वाजता गट विकास अधिकारी यांनी त्यांच्या कार्यालयात सभा आयोजित करावी लागेल असा ग्रामविकास विभागाने निर्णय घेतलेला आहे.
सभेबाबत तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना व गट विकास अधिकारी, पंचायत समिती यांचेकडे प्राप्त झालेल्या लेखी तक्रारीतील सर्व तक्रारदारांना सभेपूर्वी ८ दिवस आधी अवगत करावयाचे असून या सभेमध्ये प्राप्त तक्रारींवर योग्य ती कार्यवाही करून सदर दिवशी आलेल्या अर्जांची संख्या व त्यावर केलेली कार्यवाही याबाबतची लेखी स्वरूपात माहिती संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांना सादर करणे,
त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्हयातील सर्व गट विकास अधिकारी यांच्याकडून प्राप्त माहिती संकलित करून संबंधित विभागीय आयुक्त यांच्याकडे सादर करणे, सर्व विभागीय आयुक्त यांनी विभागातील सर्व जिल्हयांकडून प्राप्त माहितीचे संकलन करून त्याचा गोषवारा महिन्याच्या शेवटच्या आठवडयात ग्रामविकास मंत्री व अतिरिक्त मुख्य सचिव (ग्रामविकास व पंचायत राज) यांच्या कार्यालयास सादर करावयाचा आहे.
सदर शासन निर्णय ३ मार्च २०२० रोजी निर्गमित करण्यात आला असून शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (Muktipath) (Chandrpur News Updates) (Chandrapur Collector) (The Gdv) (IND vs AUS) (Juventus vs Torino) (Jungkook) (Man United vs West Ham) (Justin Bieberl) (BDO has to meet on the first Friday of every month to redress the grievances of the people)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here