बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांची जयंती संपन्न

162

The गडविश्व
गडचिरोल, दि. २५ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मानसपुत्र, रिपब्लिकन चळवळीचे ज्येष्ठ नेते तथा राज्यसभेचे माजी उपाध्यक्ष राजाभाऊ खोब्रागडे यांची 99 वी जयंती आज सकाळी अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने येथील इंदिरा गांधी चौकात साजरी करण्यात आली.
बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या प्रतिमेला पक्षाचे केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत यांच्या हस्ते माल्यार्पण तथादीप प्रज्वलन करण्यात आले व राजाभाऊंना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित मान्यवर पदाधिकारी व विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या प्रतिमेसमोर पुष्प अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचा विजय असो अशा घोषणा सुद्धा देण्यात आल्या.
या कार्यक्रमाला रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष हंसराज उंदीरवाडे आदिवासी युवा परिषदेचे जिल्हाध्यक्ष कुणाल कोवे, बौद्ध महासभेचे जिल्हा सरचिटणीस गौतम डांगे संविधान फाउंडेशनचे जिल्हा संयोजक गौतम मेश्राम, समिधा कॉलेजचे संस्थापक कालिदास राऊत, रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्राचार्य प्रकाश दुधे, प्रदेश सचिव प्रा. राजन बोरकर, विधानसभा प्रभारी प्रदीप भैसारे, महिला आघाडीच्या नेत्या सुरेखाताई बारसागडे, जिल्हाध्यक्ष नीता सहारे, ज्येष्ठ कार्यकर्त्या प्रेमीला रामटेके, कार्यालय सचिव अशोक खोब्रागडे, युवा आघाडी अध्यक्ष नरेंद्र रायपुरे, तालुका उपाध्यक्ष विजय देवताळे, सेवानिवृत्त तहसीलदार बोदेले, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक महादेव निमगडे, ज्येष्ठ कार्यकर्ते प्रेमेन्द्र सहारे, सिद्धार्थ खोब्रागडे,आदिवासी युवा परिषदेचे शशिकांत गेडाम, सुमित कुमरे, पंकज अलाम, सुरज मडावी यांचे सह शहरातील नागरिक उपस्थित होते.

(#thegdv #thegadvishva #thegadvishva #gadchirolinews )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here