येरंडीत मलेरिया, डेंग्यूविरोधात जनजागृती ; आरोग्य विभागाचा उपक्रम शाळेत उत्साहात पार

58

येरंडीत मलेरिया, डेंग्यूविरोधात जनजागृती ; आरोग्य विभागाचा उपक्रम शाळेत उत्साहात पार
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. १९ : येरंडी प्राथमिक आरोग्य केंद्र रांगीच्या वतीने मलेरिया, हिवताप, डेंग्यूसारख्या साथीच्या आजारांबाबत जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी येरंडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत १८ जुलै २०२५ रोजी जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या उपक्रमात विद्यार्थ्यांना आजारांची लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना, स्वच्छतेचे महत्त्व आदी मुद्द्यांवर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रम शाळेच्या पटांगणात पार पडला असून, विद्यार्थ्यांनीही या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला.
कार्यक्रमासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र रांगीचे सुपरवायझर सुरेश राजगडे, मलेरिया वर्कर एम. व्ही. बानबले (मिचगाव), आर. आर. किरमिरे, एस. आर. वाकडे, प्रतीक मशाखेत्री (RTW), शरद रणदिवे, महेश्वरी जांगी (आशा वर्कर) यांची उपस्थिती लाभली.
शाळेचे मुख्याध्यापक विनोद डी. जुमनाके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत स्वच्छतेच्या सवयी अंगीकारण्याचे आवाहन केले. आरोग्य विभागाचा हा उपक्रम गावागावांत पोहोचवून जनजागृतीसाठी ठोस पावले उचलली जात आहेत.
#मलेरिया_जनजागृती #डेंग्यू_प्रतिबंध #आरोग्य_विभाग #प्राथमिक_आरोग्य_केंद्र_रांगी #स्वच्छता_अभियान #येरंडी_शाळा #धानोरा_तालुका #गडचिरोली_आरोग्य #शाळा_जनजागृती #सामाजिक_उपक्रम #MalariaAwareness #HealthCampaign #DenguePrevention #PublicHealth #PHCRangi #YerandiSchool #GadchiroliHealth #CommunityAwareness #SchoolAwarenessProgram #VectorBorneDiseases #HealthEducation #RuralHealthIndia #AshaWorkers #GadchiroliInitiative

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here