The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. २२ : स्व. रामचंद्रजी दखणे विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, मुरुमगाव येथे मलेरिया निर्मूलनाबाबत जनजागृती आणि मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिराचे आयोजन संस्थेचे सचिव महेंद्र दखणे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. यावेळी तालुका आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल बनसोड प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांच्यासोबत मुख्याध्यापक बाळकृष्ण बोरकर, सतीश सुरणकर, जयेश अंबादे आदी मान्यवरही मंचावर उपस्थित होते.
डॉ. बनसोड यांनी विद्यार्थ्यांना मलेरिया आजाराची कारणे, लक्षणे, प्रतिबंधक उपाय, तसेच स्वच्छतेचे महत्त्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. रोग टाळण्यासाठी काळजी कशी घ्यावी, याबाबतही त्यांनी उपयुक्त माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन घनश्याम चिंचोलकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन जयेश अंबादे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विलास चौधरी, रमेश निसार, सुरेश तुलावी, रामाधर राणा यांचे विशेष सहकार्य लाभले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता वाढीस लागली असून, शाळा पातळीवर मलेरिया निर्मूलनासाठी सकारात्मक पावले उचलण्यात येत असल्याचे चित्र दिसून आले.
#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolinews #MalariaAwareness #HealthCamp #SchoolInitiative #StudentAwareness #PublicHealth #Gadchiroli #Dhanora #Murumgaon #CleanlinessDrive #DakaneVidyalaya
#मलेरिया_निर्मूलन #आरोग्य_जनजागृती #शालेय_उपक्रम #धानोरा #गडचिरोली #मुरुमगाव #विद्यार्थी_प्रबोधन #स्वच्छता_अभियान #आरोग्य_शिबिर #दखणे_विद्यालय
