आज कुरखेड्यात जनजागृती बाईक रॅली : १ मार्चला भव्य हिंदू संमेलन
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. २७ : सकल हिंदू समाज मंडळ, कुरखेडा यांच्या वतीने हिंदू जागृतीला नवी दिशा देण्यासाठी आज २७ रोजी जनजागृती बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीद्वारे सनातन संस्कृती, सनातन धर्म व सामाजिक एकतेचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.
दरम्यान, रविवार १ मार्च २०२६ रोजी भव्य हिंदू संमेलन आयोजित करण्यात आले आहे. दुपारी १ वाजता भव्य शोभायात्रा हनुमान मंदिर, कुरखेडा येथून निघून श्रीराम मंदिर, कुरखेडा येथे समारोप होणार आहे. सायंकाळी ५ वाजता श्रीराम नगर येथील श्रीराम मंदिरात धर्मध्वजारोहण, गोमाता पूजन व मान्यवरांचे मार्गदर्शन होईल. त्यानंतर सायंकाळी ६.३० वाजता भारत माता आरती, भजन व महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या संमेलनास छत्तीसगडमधील डोंगरगाव येथील पंडित व विनोदी वक्ते बिहारी गोस्वामी महाराज यांचे आशीर्वचन लाभणार असून, प्रमुख वक्ते म्हणून विष्णूजी देशमुख, संघटन मंत्री, विश्व हिंदू परिषद (विदर्भ प्रांत, नागपूर) यांचे मार्गदर्शन होणार आहे. तसेच कुरखेडा तालुक्यातील संत-मंडळींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
आजच्या जनजागृती बाईक रॅलीसह १ मार्चच्या भव्य हिंदू संमेलनास सकल हिंदू समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून समाजात नवी ऊर्जा व चेतना निर्माण करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.














