रांगी ग्रामपंचायतीत ‘कंपोस्ट खड्डा’ उपक्रमातून स्वच्छतेबाबत जनजागृती

89

The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि. ०२ : तालुक्यातील रांगी येथील ग्रामपंचायत कार्यालयात महाराष्ट्र दिनानिमित्त “स्वच्छ भारत अभियान” अंतर्गत ‘कंपोस्ट खड्डा भरणा’ उपक्रम राबवून गावात स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली. १ मे २०२५ रोजी पार पडलेल्या या उपक्रमात ओला कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन कसे करावे याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.
या कार्यक्रमास सरपंच फालेश्वरी प्रदीप गेडाम, उपसरपंच नूराज सुरेश हलामी, सदस्य दिनेश इसन चापले, राकेश दयाराम कोरम, अर्चना लक्ष्मीकांत मेश्राम, विद्याताई हेमंत कपाट, ग्रामपंचायत अधिकारी मकरंद बांबोळे, कर्मचारी नामदेव बैस, नितेश गेडाम, दीपक कुकडकार, महिला बचत गटातील लीलाताई कन्नाके, तसेच स्वच्छ भारत अभियान चामोर्शी पंचायत समितीच्या नोडल अधिकारी अस्मिता उपस्थित होते.
“कंपोस्ट खड्डा करू, आपले गाव स्वच्छ करू” या संदेशासोबत दोन कंपोस्ट खड्डे भरून गावकऱ्यांना ओल्या कचऱ्याचे सेंद्रिय खतात रूपांतर करण्याची माहिती देण्यात आली. महिलांच्या बचत गटांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उपक्रमाचे कौतुक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here