– विद्यार्थ्यांना त्वरित अर्ज सादर करण्याचे आवाहन!
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०९ : शैक्षणिक सत्र २०२५-२६ साठी अनुसूचित जाती, इतर मागासवर्गीय (इमाव), विमाप्र (विकसनशील मागासवर्गीय) आणि विशेष मागासवर्गीय (विजाभज) विद्यार्थ्यांसाठी महाडिबीटी पोर्टलवर मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क भरण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या ऑनलाइन प्रणालीची सुरूवात ३० जून २०२५ रोजी झाली असून, पात्र विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आपले नवीन (फ्रेश) किंवा नूतनीकरण (रिन्युअल) अर्ज सादर करण्याचे आवाहन समाजकल्याण विभागाने केले आहे.
समाजकल्याण विभागाच्या माहितीनुसार, या योजनेंतर्गत भारत सरकारच्या मार्गदर्शक तत्वांनुसार शिष्यवृत्ती प्रदान केली जात आहे. मागील शैक्षणिक सत्र २०२४-२५ मध्ये अर्ज न करणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील अर्ज सादर करण्याची संधी देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना या अर्ज प्रक्रियेविषयी योग्य मार्गदर्शन करून त्यांचे अर्ज सादर होण्याची खात्री करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांनी अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे आणि अटी व शर्ती याबद्दल सविस्तर माहिती घेण्यासाठी अधिकृत महाडिबीटी पोर्टल (https://mahadbtmahait.gov.in/Home/Index) भेट द्यावी.
महाडिबीटी प्रणालीवर अर्ज करताना शासनाच्या निर्णयानुसार लागू असलेल्या अटी व शर्तींचे पालन करणे अनिवार्य आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी वेळ न दवडता अर्ज सादर करण्यासाठी तात्काळ पावले उचलावीत, असे आवाहन समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन मडावी यांनी केले आहे.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #crimenews # #गडचिरोली #MahadBT #ScholarshipPortal #OnlineApplication #GovernmentSchemes #ScholarshipForStudents #EducationSupport #StudentAid #SocialWelfare #HigherEducation #DBTPortal #Gadchiroli #IndiaEducation #ScholarshipOpportunity #StudentScholarships #FeeWaiver #AcademicSupport #EducationalGrant #StudentEmpowerment #MaharashtraGovernment