कटेझरीत आणखी एक नक्षल स्मारक पोलिसांकडून उध्वस्त
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. १३ : गडचिरोली जिल्ह्यातील मुरुमगाव पोलीस स्टेशनअंतर्गत कटेझरी पोलीस मदत केंद्राच्या पथकाने जंगल परिसरात नक्षलवाद्यांनी उभारलेले आणखी एक स्मारक उध्वस्त करून शांततेचा संदेश दिला आहे. पोलिसांच्या या धाडसी कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधान आणि आत्मविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली, अप्पर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अप्पर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुळराज जी, अप्पर पोलीस अधीक्षक (अहेरी विभाग) कार्तिक, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी व ASP अनिकेत हिरडे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आली.
12 ऑक्टोबर 2025 रोजी पोलीस स्टेशन कटेझरीचे प्रभारी अधिकारी अजय भोसले यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा पोलीस व SRPF गट क्र. 11 च्या 19 अंमलदारांनी नक्षलविरोधी मोहिम हाती घेतली. या कारवाईदरम्यान कटेझरीपासून सुमारे 10 ते 12 किलोमीटर अंतरावरील दराची जंगल परिसरात नक्षलवाद्यांनी उभारलेले स्मारक शोधून ते पाडण्यात आले.
सदर स्मारक हे नक्षलवाद्यांच्या दहशतीचे आणि अस्तित्वाचे प्रतीक म्हणून बांधण्यात आले होते. अशा प्रकारची स्मारके स्थानिकांमध्ये भीती निर्माण करतात तसेच नक्षलवादाला अप्रत्यक्ष प्रोत्साहन देतात. त्यामुळे पोलिसांनी अशा स्मारकांचे उच्चाटन करून समाजात शांतता, सुरक्षा आणि विकासाचा संदेश देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
कारवाईदरम्यान संपूर्ण परिसराची BDDS टीमकडून तपासणी करण्यात आली असून, पूर्ण सुरक्षिततेसह ही मोहीम पार पडली. स्थानिक ग्रामस्थांच्या सक्रिय सहकार्यामुळे कारवाई यशस्वी ठरली. स्मारक पाडल्यानंतर त्या ठिकाणी वृक्षारोपण करून शांततेचे प्रतीक निर्माण करण्यात आले.
“दहशतीचे प्रतीक असलेली स्मारके पाडून शांतता, सुरक्षितता आणि विकासाचा मार्ग दृढ करणे हेच आमचे उद्दिष्ट आहे.” असे मत प्रभारी अधिकारी अजय भोसले यांनी व्यक्त केले
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #gadchirolinews














