अबुजमाडच्या जंगलात आणखी चकमक : दोन जहाल नक्षली ठार

79

The गडविश्व
गडचिरोली/ नारायणपूर, दि. २२ : गडचिरोली जिल्हा सीमेपासून अवघ्या १० किमी अंतरावर असलेल्या छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यातील अबुजमाडच्या जंगल परिसरात आज सकाळच्या सुमारास पोलीस नक्षल चकमक उडाली. या चकमकीत दोन जहाल नक्षली ठार झाल्याची माहिती पुढे येत आहे. कट्टा रामचंद्र रेड्डी उर्फ विकल्प उर्फ राजू दादा (६१), कादरी सत्यनारायण उर्फ कोसा (६७) असे ठार झालेल्या नक्षल्यांची नावे असून दोघेही केंद्रीय समिती सदस्य असल्याचे कळते. त्यांच्यावर दहा कोटींचे बक्षीस असल्याचेही समजते. सदर कारवाईने नक्षल्यांना मोठा धक्का बसला आहे.
अबूझमाड जंगलात नक्षली उपस्थित असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक रवाना झाले होते. त्यानंतर सकाळच्या सुमारास दोन्ही बाजूंनी झालेल्या गोळीबारात दोन नक्षलवादी ठार झाले. जवानांकडून कारवाईनंतर घटनास्थळावरून दोघांच्या मृतदेहासह AK-47 रायफलसह विविध शस्त्रे, मोठ्या प्रमाणात विस्फोटक साहित्य, माओवादी साहित्य, प्रचार-प्रसाराची साधने व दैनंदिन वापराच्या वस्तू हस्तगत करण्यात आल्या आहेत. सदर कारवाईवर केंद्रीय समितीचे सदस्य ठार झाल्याने नक्षल्यांना मोठा धक्का बसल्याचे बोलल्या जात आहे.
दरम्यान मागील काही दिवसांपासून पोलीस नक्षल चकमक होत असून नक्षली ठार होत आहेत.
#AbujhmadEncounter #NaxalOperation #ChhattisgarhNews #MaharashtraBorder #BastarPolice #SecurityForces #AntiNaxalAction #BreakingNews #IndianPolice #NaxalitesKilled

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here