विकसित महाराष्ट्र व्हिजन २०४७ साठी जनतेचा सक्रिय सहभाग आवश्यक

8

– जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचे आवाहन
The गडविश्व
गडचिरोली, दि. १४ : महाराष्ट्र सरकारच्या ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाअंतर्गत तयार होणाऱ्या व्हिजन डॉक्युमेंटमध्ये जनतेचा मोलाचा वाटा असणार आहे. या उपक्रमासाठी नागरिकांनी https://wa.link/o93s9m या लिंकवर माहिती भरून सक्रिय सहभाग नोंदवावा, असे स्पष्ट आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत दूरदृष्य प्रणालीद्वारे जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना मार्गदर्शन करताना त्यांनी हे आवाहन केले. बैठकीस अपर जिल्हाधिकारी नितीन गावंडे, जिल्हा नियोजन अधिकारी श्रीराम पाचखेडे यांची उपस्थिती होती.
‘विकसित भारत २०४७’ या केंद्र सरकारच्या दूरदृष्टी कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर राज्यात ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ उपक्रमाची रचना केली जात असून कृषी, उद्योग, सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरणीय, प्रशासन अशा विविध क्षेत्रांतील समित्या या व्हिजन डॉक्युमेंटवर काम करीत आहेत. यामध्ये सर्वसामान्य जनतेच्या सूचनांचा समावेश करण्याचा प्रशासनाचा मानस आहे.
या अभियानांतर्गत प्रत्येक जिल्ह्यात व्यापक चर्चासत्रांचे आयोजन करण्यात येणार असून ग्रामसेवक, आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका, शाळा व महाविद्यालयांनीही नागरिकांना या सर्वेक्षणात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
नागरिकांनी https://wa.link/o93s9m या लिंकवर जाऊन आपल्या सूचनांची नोंद करून राज्याच्या भविष्य घडवण्याच्या प्रक्रियेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolinews #विकसितमहाराष्ट्र2047 #VisionMaharashtra2047 #गडचिरोली #DistrictCollectorAppeal #PublicParticipation #MaharashtraDevelopment #GovernmentSurvey #जनतेचासहभाग #MahaFutureVision #गडचिरोलीजिल्हाधिकारी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here