गडचिरोलीत अवैध अंमली पदार्थ विक्री करणारा आरोपी अटकेत

945

The गडविश्व
गडचिरोली,दि. १६ : जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या तस्करी व अन्य अवैध धंद्यांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांकडून कडक कारवाई केली जात आहे. १५ जून २०२५ रोजी पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, गडचिरोली शहरात मोटारसायकलवरून गांजा विक्री करणाऱ्या इसमाला पोलिसांनी अटक केली.
सागर कवडू बावणे (वय २५, रा. कोटगल, ता. गडचिरोली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीच्या वाहनाची आणि राहत्या घराची झडती घेतली असता, त्याच्याकडून सुमारे १३,८०० रुपयांचा गांजा (कॅनाबीलीस वनस्पतीचे फुले), ७५,००० रुपयांची मोटारसायकल असा एकूण ९०,७०५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी आरोपीविरोधात एनडीपीएस कायद्यानुसार गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) सत्य साई कार्तिक, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, गडचिरोली सुरज जगताप यांचे मार्गदर्शनाखालीे पोस्टे गडचिरोलीचे पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक दिपक चव्हाण, पोउपनि चैतन्य काटकर व अंमलदार यांनी केलेली आहे. गडचिरोली पोलीसांनी अमली पदार्थ विक्री करणा­या, बाळगणारे व सेवन करणा­यांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here