सती नदीवरील रपट्‍याचा वापर मर्यादित स्वरूपात खुला करण्याची आम आदमी पार्टीची मागणी

85

– शेतकरी व पायी प्रवाशांच्या सोयीसाठी तातडीने निर्णय घेण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे विनंती
The गडविश्व
गडचिरोली, दि. २८ : कुरखेडा येथील सती नदीवरील पुलाचे रखडलेले बांधकाम आणि त्यामुळे नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीचा मुद्दा आम आदमी पार्टीने जोरदारपणे उपस्थित केला आहे. जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्याकडे पाठवलेल्या निवेदनात जिल्हाध्यक्ष नसीर हाशमी यांनी नदीवरील सध्याच्या रपट्याचा वापर मर्यादित स्वरूपात खुला करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, पूरस्थिती नसताना ही रपटा फक्त पायी चालणारे, दुचाकीस्वार आणि सायकलस्वार यांच्यासाठी खुला केला जावा. सध्या पुल नसल्यानं नागरिकांना जवळपास १६ किलोमीटरचा वळणमार्ग वापरावा लागत असून, यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांचे हाल वाढले आहेत. वेळ आणि इंधनाचा अपव्यय टाळण्यासाठी रपट्याचा नियंत्रित वापर महत्त्वाचा ठरेल, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून चारचाकी व मोठ्या वाहनांना रपटा वापरण्यास मनाई केली जावी, असेही सुचवण्यात आले आहे. प्रशासनाने पाण्याची पातळी आणि रपट्याची स्थिती यावर नियमित देखरेख ठेवावी आणि रपट्याच्या वापराबाबत स्थानिकांना सूचना फलकाद्वारे जागरूक करावे, अशी सूचना देखील करण्यात आली आहे.
सदर निवेदन उपविभागीय अधिकारी, कुरखेडा यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले असून, नागरिकांच्या सोयीसाठी तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

#गडचिरोली #कुरखेडा #सतीनदी #आमआदमीपार्टी #नसीरहाशमी #शेतकरीमुद्दा #स्थानिकसमस्या #रपट्याविवाद #जनहितनिवेदन #गडचिरोलीजिल्हाधिकारी #AAPGadchiroli #BridgeIssue #PublicDemand #महाराष्ट्रविकास #स्थानिकबातमी

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here