– २० लिटर मोहफुलाची दारू जप्त
The गडविश्व
गडचिरोली, दि. २५ : मुलचेरा तालुक्यातील चुटूगुंटा येथे ग्रामसभेच्या निर्णयानुसार मागील २० वर्षांपासून दारूबंदी कायम आहे. ही दारूबंदी टिकवून ठेवण्यासाठी मुक्तिपथच्या मार्गदर्शनाखाली गाव संघटना सक्रिय आहे. अशातच गावाच्या दारूबंदीला धक्का लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका विक्रेत्याकडून ग्रामस्थांनी ४ हजार रुपये किमतीची २० लिटर मोहफुलाची दारू पकडून २० हजारांचा दंड आकारला.
चुटूगुंटा गावासह परिसरातील जवळपास 9 गावातील अवैध दारूविक्री बंदीसाठी मुक्तिपथ, पोलिस विभाग व गाव संघटनेच्या संयुक्त विद्यमाने कृती कार्यक्रम राबविण्यात आले. यामुळे परिसरातील दारू विक्री बंद आहे. गावात दारूबंदी असल्याने शांतता व सुव्यवस्था टिकून आहे. अशातच एका विक्रेत्याने विक्रीकरिता गावात दारू आणली असल्याची गुप्त माहिती मिळाली. प्राप्त माहितीच्या आधारे गावातील संघटनेच्या महिलांनी एका घराची पाहणी केली असता जवळपास ४ हजार रुपये किमतीची २० लिटर मोहाची दारू मिळून आली. संबंधित दारूविक्रेत्यावर ग्रामस्थांच्या ठरावानुसार कारवाई करण्यासाठी गावात बैठक घेऊन दारू विक्रेत्यावर २० हजार रुपये दंडात्मक कार्यवाही करण्यात आली. तसेच यापुढे दारू विक्री केल्यास ग्रामसभेच्या ठरावानुसार दंड, शासकीय दाखल्यांपासून वंचित व पोलिस कारवाई करण्याची ताकीद देण्यात आली. यावेळी मुक्तिपथ तालुका संघटक रुपेश अंबादे, मुक्तिपथ संघटना अध्यक्ष कांताबाई मेश्राम, पोलिस पाटील सुरेश मडावी, ईश्वर उरेते, रायसिंग दब्बा, गंगाधर वेलादी, किशोर मडावी, दिलीप वेलादी, दिलीप मेश्राम, कमलाबाई आत्राम ग्राम संघ अध्यक्ष, निलिमा अलाम ग्राम संघ सचिव, वर्षा मडावी पेसा मोबिलायझर, दुर्गा उरेते आशा वर्कर, लक्ष्मीबाई मेश्राम, कांताबाई वेलादी, निलिमा आलाम, द्रौपदी शेडमाके, ज्योती दब्बा, वनिता कन्नाके यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #muktipath )