– नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा
The गडविश्व
गडचिरोली, १५ ऑगस्ट : गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाने पाण्याच्या पातडीत वाढ झाल्याने धरणाचे ३३ पैकी ३३ दरवाजे २.५० मी. ने उघडलेले असुन विसर्ग ५,२९,७२५ क्युसेक्स (१५,००० क्युमेक्स) आहे. धरणातून पाणी सोडत असल्याने नद्यांची पाणी पातळी वाढलेली आहे. त्यामुळे नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
तसेच संजय सरोवर धरणाचे १० पैकी ४ गेट उघडलेले असुन विसर्ग ३०,४७७ क्युसेक्स (८६३ क्युमेक्स) आहे.
चिचडोह बॅरेज चे ३८ पैकी ३८ गेट उघडलेले असुन विसर्ग ५,१६,४४७ क्युसेक्स (१४,६२४ क्युमेक्स) आहे यामुळे वैनगंगा नदी पत्राच्या पाण्याच्या पातडीत वाढ होत आहे.
वडसा व वाघोली या सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार नदीची पाणी पातळी इशारा पातळीच्या वर आहे तर आष्टी या सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार नदीची पाणी पातळी धोका पातळीच्या वर आहे.

वर्धा नदी :
उर्ध्व वर्धा प्रकल्पाचे १३ पैकी १३ गेट उघडलेले असुन विसर्ग ३६,६२२ क्युसेक्स (१,०३७ क्युमेक्स) आहे.
निम्न वर्धा प्रकल्पाचे ३१ पैकी ३१ गेट उघडलेले असुन विसर्ग २९,२०५ क्युसेक्स (८२७ क्युमेक्स) आहे.
बामणी (बल्हारशा) व सिरपूर/सकमुर केंद्रावरील नोंदीनुसार नदीची पाणी पातळी इशारा पातळीच्या खाली आहे.
प्राणहिता नदी :
महागांव सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार प्राणहिता नदीची पाणी पातळी इशारा पातळीच्या जवळ पोहोचलेली आहे.
गोदावरी नदी :
श्रीपदा येलमपल्ली प्रकल्पाचे ६२ पैकी १२ गेट उघडलेले असुन विसर्ग २०,७२१ क्युसेक्स (५८७ क्युमेक्स) आहे.
लक्ष्मी बॅरेज (मेडीगड्डा) चे ८५ पैकी ८५ गेट उघडलेले असुन विसर्ग ६,३६,१३० क्युसेक्स (१८,०१३ क्युमेक्स) आहे.
कालेश्वरम सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार नदीची पाणी पातळी इशारा पातळीच्या खाली आहे. पण पाण्याची पातळी वाढत आहे
इंद्रावती नदी :
जगदलपूर, चिंदनार व पाथागुडम या सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार इंद्रावती नदीची पाणी पातळी धोका पातळीच्या वर आहे.
पर्लकोटा नदीची पाणी पातळी भामरागड सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार धोका पातळीच्या वर आहे.
नद्यांच्या पाणलोट क्षेत्रातील अतिवृष्टीमुळे व उर्ध्व भागातील धरणांमधून विसर्ग प्रवाहीत करण्यात आल्याने नद्यांची पाणी पातळी वाढलेली आहे, त्यामुळे नदीकाठावरील गावातील नागरीकांनी उचित सतर्कता बाळगावी असे आवाहन करण्यात आले आहे.