The गडविश्व
अहेरी, १५ ऑगस्ट : तालुक्यातील इंदाराम येथील कस्तुरबा गांधी विद्यालयात माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.
स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर देशभरात १३ ते १५ ऑगस्ट दसरम्यान अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ मोहिमही राबविण्यात आली. नागरिकांनाही उत्स्फूर्त असा सहभाग दर्शवला. आज जिल्ह्यात विविध ठिकाणी, कार्यालयात ध्वजारोहन कार्यक्रम पार पडला. इंदाराम येथील कस्तुरबा गांधी विद्यालयात माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते ध्वजारोहन कार्यक्रम पार पडला.
यावेळी विद्यालयातील शिक्षकवृंद, नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
