– श्रीकृष्ण क्रीडा मंडळ आलापलीच्या वतीने क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
The गडविश्व
अहेरी : तालुक्यातील आलापली येथे श्रीकृष्ण क्रीडा मंडळाच्या वतीने भव्य रात्र कालीन टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या 30 यार्ड सर्कल सामन्योयांचे आयोजन करण्यात आले होते.
सदर क्रिडा स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या कडून तर द्वितीय पारितोषिक अहेरी पंचायत समितीचे माजी उपसभापती सौ सोनालीताई अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून पुरस्कार देण्यात येणार आहे.

आज सदर स्पर्धेचे उदघाटन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी टायगर ग्रुपचे दौलतभाऊ रामटेके होते. तर मंचावर ग्रा.प.सदस्या सौ.छायाताई सप्पीडवार,जूलेख शेख, सुरेश संड्रा, सुनंदा भीमनपलीवार, चंद्रकिशोर पौड़ी,रामया सप्पीडवार, निलेश नामनवार होते. यावेळी प्रतिष्ठित नागरिक व मंडळाचे अध्यक्ष मुनेश गुंडावार, उपाध्यक्ष अमोल सामीलवार, प्रकाश सिंगनेर, तिरुपती बोम्मेवार,आकाश सिंगनेर आदि उपस्थित होते