– गोलकर वार्डात श्रीकृष्ण मंदिर होणार
The गडविश्व
अहेरी : तालुक्यातील आल्लापली येथील गोलकार वार्डात जि.प. माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते श्रीकृष्ण मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले. वार्डात श्रीकृष्ण मंदिर होणार असल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
आल्लापली येथील मोहल्ला वार्ड क्र.६ मध्ये श्रीकृष्ण मंदिर आहे. गोलकर समाजबांधव या ठिकाणी आस्था जोपासत असतात .मात्र सदर मंदिर लाकडा पासून तयार केले होते, प्रत्येक वैयक्तिक कार्यक्रम असो, सण उत्सव असो किंवा सामाजिक कार्यक्रम असो सर्वप्रथम या मंदिरात जावून पूजा अर्चाना करूनच बाकीचे कार्यक्रम पार पाडत असतात. मात्र मंदिर व्यवस्थित नसल्याने येथील गोलकर समाज बांधवांनी बैठक घेवून जि.प. माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याकडे माता मंदिर बांधकाम करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली असता कंकडालवार यांनी शासनाकडून मंदिर बांधकामासाठी निधी प्राप्त होत नाही. मात्र मी माझ्या स्वखर्चाने श्रीकृष्ण मंदिर बांधून देतो अशी ग्वाही दिली होती. आज सदर मंदिर बांधकामाचे जि.प. माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते पूजा अर्चाना करून रितसर भूमिपूजन करण्यात आले. यावेळी जि.प. माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या कडून भोजन व्यवस्था करण्यात आली होती.याप्रसंगी अमोल सामीलवार, विजय बोमनवार, रामया सप्पीडवार, मल्लेश गुंडावार, रामया मूडसुवार, विजय आरेवार, सुरेखा संडी, मनीषा संडी, सावित्रीबाईं जिमोझवार, लिंगुबाई मूडसुवार, तरुण आरेवार, साई येरावार, शिवम नामनवार, आकाश सिंगनेर, यश कुमरवार, प्रवीण भीमनपलीवार, धनंजय चेकरमवार, अनिल बोलेम, प्रमोद येरावार, पेंटया मूडसुवार, तिरुपती मूडसुवार, प्रवीण सप्पीडवार, राजन्ना मेकलवार, ताराबाई मेरगा, गटया बुसावार, जूलेख शेख व गोलकर समाज बांधव उपस्थित होते.
