– नवं वधू-वरास दिले शुभाशीर्वाद
The गडविश्व
अहेरी : इंदाराम येथील सुरेश कोत्तावडलावार यांच्या मुलीच्या विवाह सोहळा इंडियन फक्शन हॉल अहेरी येथे पार पडला होता. या विवाह सोहळ्याला आदिवासी विद्यार्थी संघटनेचे नेते तथा गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी भेट देऊन नवं वधू-वरास भेट वस्तू देऊन शुभाशीर्वाद दिले आहे.
यावेळी अविसचे इंदारामचे उपसरपंच वैभव कंकडालवार, अहेरी नगर पंचायतीचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, शिनु कोत्तावडलावार, कार्तिक तोगम , राकेश सडमेक, परिसरातील अविसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
