– भारतीय राष्ट्रीय काँग्रेस डिजिटल सदस्य नोंदणी उपक्रम
The गडविश्व
देसाईगंज : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने संपुर्ण देशात डिजिटल सदस्यता नोंदणी उपक्रम राबविण्यात येत असुन यात महाराष्ट्रातुन पहिल्या दहा जिल्ह्यात गडचिरोली जिल्ह्याने तर सर्वाधिक सदस्य नोंदणीचा विक्रम आपल्या नावावर देसाईगंज शहर युवक कॉंग्रेस अध्यक्ष पिंकु बावणे यांनी नोंदविल्याने पक्षाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
नागपुर येथील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या जिल्हा कार्यालयात सदस्यता नोंदणी संदर्भात आढावा घेण्यात आला असता, संपुर्ण देशातुन गडचिरोली जिल्ह्याने सदस्य नोंदणी केली तर गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक सदस्य नोंदणी पिंकु बावणे यांनी केल्याने सत्कार करण्यात आला. यावेळी महाराष्ट्राचे PRO माजी केंद्रीय मंत्री राजु पल्लम, उर्जा मंत्री नितिन राऊत, प्रदेश कार्याध्यक्ष तथा आमदार प्रणिती शिंदे, मध्य प्रदेश प्रभारी आशिष दुवा, प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत हांडोरे, भाई नगराळे, राहुल साळवे, माजी खासदार विलास मुत्तेमवार, गडचिरोली जिल्हा अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, जिल्हा निरीक्षक डाॅ.नामदेव किरसान, प्रदेश सचिव रविंद्र दरेकर, प्रदेश सचिव डाॅ. नितीन कोडवते, डाॅ.चंदा कोडवते सह प्रभारी शिशिर वंजारी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोर पोरटी, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष जीवन नाट, जिल्हा अध्यक्ष रुपाली पंदिलवार, तालुका अध्यक्ष परशराम टिकले, माजी जिल्हा परिषद सदस्य नंदू नरोटे, तालुका अध्यक्ष आरती लहेरी, नरेंद्र गजपुरे आदी पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे औचित्य साधून गडचिरोली जिल्ह्यात पदाधिकाऱ्यांतून सर्वाधिक डिजिटल सदस्य नोंदणी करणाऱ्या इतरही पदाधिकाऱ्यांत मिलींद खोब्रागडे, राजेंद्र बुल्ले, शोएब पठाण, यामिनी कोसरे यांचा समावेश असुन पक्षाच्या वतीने संबंधितांचा देखील सत्कार करण्यात आला.
