धानोरा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेची नवी कार्यकारिणी जाहीर

35

धानोरा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेची नवी कार्यकारिणी जाहीर
– १२६ दुकानदारांच्या उपस्थितीत सर्वानुमते निवड
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. १८ : धानोरा तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार संघटनेची नवी कार्यकारिणी शुक्रवार, १७ जानेवारी २०२६ रोजी सर्वानुमते गठित करण्यात आली. धानोरा गार्डन येथे पार पडलेल्या संघटनेच्या सभेत तब्बल १२६ स्वस्त धान्य दुकानदार उपस्थित होते. यावेळी आगामी पाच वर्षांच्या कालावधीसाठी संघटनेच्या नव्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.
सभेत सर्व दुकानदारांच्या एकमताने सुनीता झंजाळ यांच्या अध्यक्षतेखाली नवीन कार्यकारिणीची रचना करण्यात आली. त्यानुसार तालुका अध्यक्षपदी जाकीर कुरेशी, तालुका उपाध्यक्षपदी सुनीता झंजाळ, तालुका सचिव म्हणून माणिकजी गेडाम, सहसचिवपदी अनिलजी दळांजे तर कोषाध्यक्षपदी समीर कुरेशी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
याचबरोबर संघटनेच्या तालुका सभासद म्हणून प्रेमीला गावडे, जास्वंदा वट्टी, शारदा दर्रो, प्रेमीला हिचामी, निराशा इंदूरकर, माणिकजी गेडाम, राजू निकोडे, मारोती गेडाम, चिंरामजी व रोशन शेडमाके यांची नियुक्ती करण्यात आली.
नवीन कार्यकारिणी घोषित झाल्यानंतर उपस्थित सर्व स्वस्त धान्य दुकानदारांनी संघटनेच्या माध्यमातून आपले कर्तव्य, जबाबदाऱ्या व ग्राहकांप्रती असलेली भूमिका प्रामाणिकपणे पार पाडण्याचा शपथविधी घेतला. ही सभा शांततापूर्ण व उत्साही वातावरणात पार पडली.
नव्या कार्यकारिणीकडून स्वस्त धान्य दुकानदारांच्या विविध समस्या, अडचणी व मागण्या शासनदरबारी प्रभावीपणे मांडून संघटनेचे कार्य अधिक सक्षमपणे राबविले जाईल, असा विश्वास यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here