नक्षल संघटनेला मोठा धक्का : एरिया कमिटी प्रमुख दिलीप वेंडजासह चार नक्षली ठार
The गडविश्व
बीजापूर / विशेष प्रतिनिधी, दि.१८ : छत्तीसगड–महाराष्ट्र सीमेवरील बीजापूर नेशनल पार्क परिसरात सुरक्षा दलांनी राबविलेल्या नक्षलविरोधी कारवाईत महिला नक्षलीसह चार नक्षली ठार झाले. या चकमकीत नेशनल पार्क एरिया कमिटीचा प्रमुख दिलीप वेंडजा ठार झाला असून, या कारवाईमुळे नक्षल संघटनेला मोठा धक्का बसला आहे.
विश्वसनीय गुप्त माहितीच्या आधारे बीजापूर नेशनल पार्क क्षेत्रात नक्षली नेता पापारावसह मोठ्या संख्येने नक्षली तळ ठोकून असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यानुसार डीआरजी (डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह गार्ड) चे जवान नक्षलविरोधी अभियानासाठी परिसरात दाखल झाले.
या चकमकीत राष्ट्रीय उद्यान क्षेत्र समितीचे प्रमुख दिलीप वेंडजा, क्षेत्र समिती सदस्य पालो पोडियम, माधवी कोसा आणि पीएम जुग्लो वंजाम हे ठार झाले.
या चकमकीनंतर, १८ जानेवारी रोजी सैनिकांच्या एका पथकाने शोध मोहीम राबवली. या दरम्यान, आणखी दोन मृतदेह सापडले, ज्यामुळे ठार झालेल्या नक्षलवाद्यांची एकूण संख्या सहा झाली. तथापि, दोन नक्षलवाद्यांची ओळख पटलेली नाही. पोलिस पथके त्यांची ओळख पटवण्याचे काम करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्या परिसरात ही चकमक झाली तो भाग खूंखार नक्षली पापाराव याच्या प्रभावाखाली मानला जातो. पापाराव हा नेशनल पार्क क्षेत्राचा इंचार्ज असून तो दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटी (DKSZCM) चा एकमेव सक्रिय सदस्य असल्याचे सांगितले जाते. पापाराव ठार झाल्यास DKSZCM कॅडर पूर्णपणे संपुष्टात येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
सुरक्षा दलांनी घटनास्थळावरून सर्व मृतदेह ताब्यात घेतले असून दोन एके-४७ रायफलसह मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केल्याची माहिती आहे. चकमकीनंतर संपूर्ण परिसराची घेराबंदी करण्यात आली सर्च ऑपरेशन अधिक तीव्र करण्यात आले आहे.
या कारवाईमुळे नेशनल पार्क परिसरातील नक्षली हालचालींना मोठा आळा बसणार असल्याचे सुरक्षा यंत्रणांकडून सांगण्यात येत आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #NaxalEncounter #Bijapur #NationalPark #AntiNaxalOperation #DRG #SecurityForces #Naxalism #MaoistEncounter #AreaCommitteeChief #DilipVendja #DKSZCM #ChhattisgarhMaharashtraBorder #PoliceAction #InternalSecurity #EncounterNews














