सावली : मासेमारी करताना डोंगा पलटला : असोला मेंढा तलावात बुडून युवकाचा मृत्यू

5

सावली : मासेमारी करताना डोंगा पलटला : असोला मेंढा तलावात बुडून युवकाचा मृत्यू
The गडविश्व
ता. प्र / सावली, दि. ०५ : असोला मेंढा तलावात मासेमारी करण्यासाठी गेलेल्या युवकाचा डोंगा उलटल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दुपारच्या सुमारास घडली. मृताचे नाव भगवान रमेश गेडाम (वय 32, रा. आसोला चौक) असे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भगवान गेडाम एकटाच तलावात मासेमारी करण्यासाठी गेला होता अशी माहिती आहे. जाळे टाकत असताना अचानक डोंगा पलटला आणि तो पाण्यात पडला. बाहेर पडण्याचा प्रयत्न निष्फळ ठरला व त्याचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पाथरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सपोनि नितेश डोर्लीकर, सहाय्यक फौजदार सतीश गुरनुले, पोलीस हवालदार खेलेश कोरे, अंमलदार मेघश्याम गायकवाड, बळीराम बारेकर व प्रविण कोवे यांसह पथक घटनास्थळी पोहोचले. गावकऱ्यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला. पंचनामा करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
या अचानक झालेल्या अपघाती मृत्यूने परिसरात शोककळा पसरली आहे.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #chandrpurnews #asolamendha

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here