गडचिरोली : ‘उमेदवारांची पार्श्वभूमी कळणार तरी कशी?’ नगरपरिषद निवडणुकीची उमेदवारांची शपथपत्रे संकेतस्थळावरून गायब

14

गडचिरोली : ‘उमेदवारांची पार्श्वभूमी कळणार तरी कशी?’ नगरपरिषद निवडणुकीची शपथपत्रे संकेतस्थळावरून गायब
– गडचिरोली निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
The गडविश्व
गडचिरोली, दि.३० : लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये उमेदवारांची नामनिर्देशन माहिती व शपथपत्रे भारत निवडणूक आयोगाच्या https://affidavit.eci.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर सर्वांसाठी सहज उपलब्ध केली जात होती. त्याच धर्तीवर महापालिका, नगरपरिषद निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने https://mahasec.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उमेदवारांची शपथपत्रे अपलोड करण्याची व्यवस्था केली आहे.
मात्र गडचिरोली नगरपरिषद निवडणुकीत ही व्यवस्था कोलमडल्याचे चटकन लक्षात येते. देसाईगंज आणि आरमोरी नगरपरिषद क्षेत्रातील उमेदवारांची माहिती नीट उपलब्ध असताना गडचिरोली शहरातील उमेदवारांपैकी फक्त एकाच उमेदवाराचेच शपथपत्र संकेतस्थळावर दिसते, उर्वरित सर्वांची माहिती अद्याप ‘गायब’ आहे.
मतदारांना उमेदवारांचे शैक्षणिक तपशील, गुन्हेगारी नोंदी, मालमत्ता आणि आर्थिक स्थिती यासारखी महत्त्वाची माहिती जाणून मतदानाचा निर्णय घेता यावा म्हणून शपथपत्रांचे अपलोड करणे अत्यावश्यक असते. मात्र या मूलभूत माहितीचाच अभाव असल्याने, “उमेदवारांची पार्श्वभूमी कळणार तरी कशी?” असा सरळ व टोकाचा प्रश्न आता नागरिक विचारू लागले आहेत.
निवडणुकीला काही दिवस उरले असतानाही शपथपत्रे अपलोड करण्यामध्ये झालेली ही दिरंगाई नेमकी का? संबंधित विभागाची जबाबदारी कुठे? या बाबत नागरिकांनी राज्य निवडणूक आयोगाच्या कामकाजावर गंभीर संशय व्यक्त केला आहे.
नगरपरिषद क्षेत्रातील सर्व उमेदवारांची शपथपत्रे तात्काळ संकेतस्थळावर उपलब्ध करा अशी मागणी जोर धरू लागली असून पारदर्शकता आणि जबाबदारी हा लोकशाहीचा पाया आहे, आणि प्रशासनाने ही प्रक्रिया पारदर्शक ठेवावी, अशी जोरदार मागणी शहरातून होत आहे.

असे तपासा उमेदवारांची शपथपत्रे

१) https://mahasec.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्या
२) Online Nomination Form वर क्लिक करा.
३) त्यानंतर नवीन टॅब ओपन होईल https://mahasecelec.in/
४) Affidavit by the final contesting candidates वर क्लिक करा.
५) नवीन टॅब ओपन होईल त्यामध्ये Search Document मध्ये local Body, Division, District मध्ये पर्याय निवडून उमेदवारांची माहिती, शपथपत्र पाहता येईल.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #GadchiroliElections #CandidateAffidavits #MissingInformation #ElectionTransparency #MunicipalElections #MahaSEC #ECIAffidavits #VoterRights #ElectionAccountability

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here