गडचिरोली विकासासाठी राकाँ–मनसे–उबाठा आघाडी एकजूट

43

– नगराध्यक्षपदासाठी बिपाशा भुसारे मैदानात, १८ उमेदवार रिंगणात
The गडविश्व
गडचिरोली, दि. १९ : आगामी नगरपरिषद निवडणुकीत गडचिरोली शहराच्या सर्वांगीण विकासाचा स्पष्ट दृष्टिकोन ठरवत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी भक्कम आघाडी जाहीर केली. या आघाडीने नगराध्यक्ष पदासाठी बिपाशा भुसारे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले असून एकूण १८ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविण्यात आले आहेत.
आज आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार यांनी या आघाडीची अधिकृत घोषणा केली. त्यांनी सांगितले की, राजकीय बदलांसाठी नव्हे, तर गडचिरोलीच्या खऱ्या विकासासाठी ही आघाडी उभी राहिली आहे. शहराच्या प्रश्नांवर ठोस काम करण्यासाठी आम्ही जनतेसमोर आहोत.
या आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसचे १२ तर उद्धवसेनेचे ६ उमेदवार मैदानात आहेत. तिन्ही पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उमेदवारांच्या प्रचारासाठी सक्रिय झाल्याने शहरातील राजकीय वातावरण अधिक तापले आहे.
पत्रकार परिषदेला राकाँचे ॲड. संजय ठाकरे, उद्धवसेनेचे जिल्हाध्यक्ष वासुदेव शेडमाके, मनसे जिल्हाध्यक्ष राजेंद्र साळवे, ओबीसी सेलचे शेमदेव चाफले, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार बिपाशा भुसारे यांच्यासह अमोल गण्यारपवार, नंदू कुमरे, नागनाथ भुसारे, एजाज शेख, राजेंद्र लांजेवार, करण गण्यारपवार आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
आगामी निवडणुकीत ही आघाडी शहराच्या राजकीय समीकरणात मोठा बदल घडवून आणेल, अशी चर्चाही राजकीय वर्तुळात रंगत आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here