सीमावर्ती भागात भीषण चकमक : कुख्यात नक्षल नेता माडवी हिडमा पत्नीसह ठार

22

सीमावर्ती भागात भीषण चकमक : कुख्यात नक्षल नेता माडवी हिडमा पत्नीसह ठार
– नक्षल चळवळीला मोठा धक्का; सहा नक्षलवादी ठार
The गडविश्व
गडचिरोली / विशेष प्रतिनिधी, दि. १८ : त्रि-सीमा जंगल हादरवणाऱ्या मोठ्या कारवाईत सुरक्षा दलाने पीपल्स लिबरेशन गुरिला आर्मीचा (PLGA) प्रमुख आणि देशातील सर्वाधिक कुख्यात नक्षल नेता माडवी हिडमा (४४) याला अखेर ठार केले.
https://x.com/PTI_News/status/1990697332527280253?s=19
आंध्र प्रदेश–छत्तीसगड–तेलंगणा यांच्या सीमेलगतच्या अल्लुरी सीतारामराजू जिल्ह्यात मंगळवारी पहाटे राबविण्यात आलेल्या अत्यंत गोपनीय संयुक्त मोहिमेत हे मोठे यश मिळाले. या चकमकीत हिडमाची पत्नी राजे उर्फ राजक्का यांच्यासह एकूण सहा नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.
https://x.com/ANI/status/1990696473294717020?s=19
त्रि-सीमा परिसरातील घनदाट जंगल हे नक्षलवाद्यांचे पारंपरिक आश्रयस्थान. येथील गुप्त तळांबाबत खात्रीशीर माहिती मिळताच सुरक्षा दलांनी व्यापक नियोजन करून मोठी मोहीम राबवली. पहाटेच्या सुमारास जवानांनी नक्षल तळाला वेढा टाकताच दोन्ही बाजूंनी तासभर प्रचंड चकमक उडाली. अखेर जवानांच्या भेदक कारवाईपुढे PLGAचा कुप्रसिद्ध कमांडर हिडमा आणि त्याचे सहकारी नमले.
घटनास्थळावरून सहा नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले असून आणखी काही जण ठार झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. परिसरात अद्यापही मोठ्या प्रमाणात कॉम्बिंग ऑपरेशन सुरू आहे.
हिडमा हा गेल्या दोन दशकांतील सर्वात मोठ्या नक्षल हल्ल्यांचा सूत्रधार असल्याचे नोंदवले गेले आहे. २०१० मधील दंतेवाडा येथे ७६ सीआरपीएफ जवानांची निघृण हत्या, २०१३ चा झिरम व्हॅली हल्ला, तसेच २०२१ मधील सुकमा–बिजापूर हल्ला यांसह अधिक मोठ्या घटनांमध्ये त्याची थेट भूमिका होती. त्यामुळे हिडमाचा अंत हा नक्षल चळवळीला बसलेला सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolinews #Breaking #NaxalOperation #MadviHidmaKilled #SecurityForces #BorderEncounter #GadchiroliNews #ExclusiveReport #NaxalAffectedAreas

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here