कुरखेडा : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला ठेंगा, सती नदी पुलावरून अवजड वाहनांचा प्रवास

12

कुरखेडा : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला ठेंगा, सती नदी पुलावर अवजड वाहनांचा प्रवास
– स्थानिक प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष, नागरिकांत संतापाचा भडका
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, दि. १८ : राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४३ वर कुरखेडा-कोरची मार्गाचे काम सुरू असताना जिल्हाधिकारी गडचिरोली यांनी सती नदीवरील तात्पुरत्या पुलावर अवजड वाहनांसाठी स्पष्ट बंदी घालून आदेश जारी केले होते. हलकी वाहने व दुचाकीसाठीच हा मुरूमाचा डायव्हर्जन खुला ठेवण्यात आला होता. मात्र हा आदेश आज पूर्णपणे अमलातूनच गायब झाल्याचे चित्र समोर आले आहे.
डंपर, ट्रक, काँक्रिट मिक्सर, JCB आदी अवजड वाहनांचा दिवसरात्र सुरु असलेला सुळसुळाट पुलाच्या सुरक्षिततेलाच धोका निर्माण करत असून मुरूमाचा अरुंद रस्ता खोल खड्ड्यांनी पोखरला आहे तसेच धुळीचे साम्राज्य निर्मण झाले असून वाहनचालकांना दोन पावले पुढेही दिसत नाही अशी प्रत्यक्ष स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे स्थानिक नागरिकांची तीव्र नाराजी ओसंडून वाहत आहे.
हा रस्ता आमच्या दुचाकी आणि छोट्या वाहनांसाठी. पण आता डंपरचे इतके प्रमाण वाढले की जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतो. अपघात कोणत्याही क्षणी होईल असे मत येथील नागरिक व्यक्त करताना दिसत आहे.
दरम्यान जिल्हाधिकारी अविशांत पांडा यांनी अवजड वाहनांसाठी पर्यायी मार्गाचा अनिवार्य वापर करण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. पण स्थानिक प्रशासनाकडून कोणतीही कारवाई न झाल्याने हे वाहनचालक मनमानी करत आहेत. कंत्राटदारांच्या दुर्लक्षामुळेही परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. या पुलाची क्षमता आणि ताण लक्षात घेता मोठा अपघात घडण्याची शक्यता वाढली असून त्या पार्श्वभूमीवर नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि प्रवासी यांनी प्रशासनाला तत्काळ निरीक्षण, बंदोबस्त आणि कडक निर्बंध लावण्याची मागणी केली आहे. अवजड वाहनांची मनमानी थांबवली नाही, तर सती नदी पुलावर मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #thegadvishva #gadchirolipolice Administrative Failure | Heavy Vehicles Rampage on Sati River Diversion | Public Safety at Risk

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here