– बिरसा मुंडा जयंतीनिमित्त प्रभातफेरी, सांस्कृतिक कार्यक्रमांनी स्कूल दुमदुमले
The गडविश्व
भामरागड, दि. १७ : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा, जारावंडी येथे क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त जनजातीय गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्याध्यापक बी. एम. पंधरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमात गावकऱ्यांसह विद्यार्थी, शिक्षकवर्ग आणि मान्यवरांची उपस्थिती लक्षणीय होती.
कार्यक्रमाचे उद्घाटन वासुदेवराव कोडापे यांनी केले. प्रमुख अतिथी म्हणून योगेश कुमरे, दिलीप दास, पी. डब्ल्यू. वानखेडे, ए. एम. बारसागडे, बी. जी. दाऊदसरे, एच. बी. गेडाम, लक्ष्मण सोमकुवर, ए. एम. राणा, रमेश मादरबोईना, किशोर घोडेस्वार, संगीता जौन्जाळ, मैनू आतला, राजकुमार मुंजम व सौरभ राठोड उपस्थित होते.
प्रास्ताविक करताना ए. एम. बारसागडे यांनी बिरसा मुंडा यांच्या क्रांतिकारी जीवनकार्याचा आढावा घेत जनजातीय गौरव दिन साजरा करण्यामागील उद्देश स्पष्ट केला. पहाटे गावातून बँड पथकाच्या तालावर प्रभातफेरी काढण्यात आली. घोषणाबाजी आणि जनजागृतीपर संदेशांमुळे गाव परिसर भारावून गेला.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी भव्य सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. नृत्य, गीत, कथन, नाट्य अशा विविध प्रकारांनी विद्यार्थ्यांनी उपस्थितांची वाहवा मिळवली. प्रकाश वानखेडे, योगेश कुमरे, दिलीप दास, एच. बी. गेडाम, संगीता जौन्जाळ, जयेश चौधरी आणि विद्यार्थ्यांनी प्रभावी भाषणातून बिरसा मुंडा यांचा वारसा उजाळला.
अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक बी. एम. पंधरे यांनी बिरसा मुंडा यांच्या अन्यायाविरुद्धच्या संघर्षाची गाथा सांगत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी. एन. काटेंगे यांनी केले, तर आभार बी. जी. दाऊदसरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चंदू पोटावी, एन. डब्ल्यू. काशीवार, व्ही. एल. मोहुर्ले, शुभम मडावी, आकाश कोडापे, रीना कुळमेथे, वड्डे, आनंद मडावी, रामचंद्र मडावी, मुमताज पठाण, सचिन पेंदोर व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice














