The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि. ०७ : धानोरा शहरात आज देशभक्तीच्या जयघोषांनी वातावरण भारावून गेले. “वंदे मातरम” या राष्ट्रीयगीताच्या १५० व्या वर्षानिमित्त कौशल्य, उद्योजकता, रोजगार व नावीन्यता तसेच सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद हायस्कूल, धानोरा येथे भव्य सामूहिक गायन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान देवाजी तोफा यांनी भूषविले. प्रमुख वक्ते म्हणून आकाश सातपुते, तर प्रमुख पाहुणे म्हणून मा. तहसीलदार गणेश माळी, सुमित पुरशेट्टीवार (RFO धानोरा), विनोद लेंनगुरे, दौलत वरवाडे आणि सुधीर झजाड हे मान्यवर उपस्थित होते.
या सोहळ्यात शिक्षक, विद्यार्थी, नागरिक आणि विविध सामाजिक संघटनांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून भारतमातेप्रती आपली कृतज्ञता व अभिमान व्यक्त केला. सामूहिक स्वरात गूंजलेल्या “वंदे मातरम”च्या घोषणा आणि देशभक्तीपर गीतांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थित मान्यवरांनी आयोजकांचे कौतुक केले व देशभक्तीच्या या संस्कारमय उपक्रमाला सलाम केला.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #dhanora














