गडचिरोली : ऐन दिवाळीतही रानटी हत्तींचा कहर,नागरिकांमध्ये भीतीचे सावट

11

गडचिरोली : ऐन दिवाळीतही रानटी हत्तींचा कहर,नागरिकांमध्ये भीतीचे सावट
– पोर्ला परिसरात हत्तींचा कळप दाखल
The गडविश्व
गडचिरोली, दि. २३ : जिल्ह्यातील रानटी हत्तींचा कळप पुन्हा एकदा नागरिकांच्या जीवनात भीतीचं सावट आणत आहे. सध्या हा कळप गडचिरोली तालुक्यातील पोर्ला परिसरात दाखल झाल्याची माहिती असून ऐन दिवाळीत ग्रामस्थांच्या सणाचा आनंद फिका पडला आहे.
मुख्य मार्गालगतच्या जंगल परिसरात रानटी हत्तींच्या कळपाचा वावर असल्याने परिसरातील नागरिकांना ये-जा करणे धोक्याचे ठरत आहे. “हत्तींच्या डरकाळ्यांनी दिवाळीचे फटाकेही शांत झाले,” अशी व्यथा स्थानिकांनी व्यक्त केली.
दरवर्षी दिवाळीत नातलगांच्या भेटीगाठीसाठी लोक गावाकडे धाव घेतात; मात्र या वर्षी हत्तींच्या कळपामुळे अनेकांनी प्रवास टाळला आहे.त्यातच हत्तींच्या कळपाने अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान केल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. ग्रामस्थ कायम दहशतीत असून संध्याकाळी घराबाहेर पडायलाही घाबरत आहेत.
वनविभागाने घटनास्थळी पथके पाठवून हत्तींच्या हालचालीवर लक्ष ठेवले आहे. हत्तींच्या कळपाला जंगलाच्या आत ढकलण्याचे प्रयत्न सुरू असून नागरिकांनी सुरक्षित अंतर राखावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #forest #Gadchiroli #Porla #WildElephants #Diwali2025 #ForestDepartment #ElephantAlert #GadchiroliNews #Maharashtra #WildlifeConflict #HumanWildlifeSafety
#गडचिरोली #पोर्ला #रानटीहत्ती #दिवाळी२०२५ #वनविभाग #GadchiroliNews

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here