सावली : वाघाचा हल्ल्यात गुराखी गंभीर जखमी

8

सावली : वाघाचा हल्ल्यात गुराखी गंभीर जखमी
– दिवाळीतही नागरिक दहशतीत
The गडविश्व
मूल, दि. २३ : सावली वनपरिक्षेत्रातील टेकाडी बीटात वाघाच्या हल्ल्यात एक गुराखी गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास कक्ष क्रमांक १७८२ मध्ये घडली.
भगवान शीतकुरा गोहने (वय ५७, रा. टेकाडी) असे जखमीचे नाव
असून ते दररोजप्रमाणे आपली गुरे चराईसाठी जंगलात घेऊन गेले होते. दरम्यान त्याचवेळी झाडीत दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला चढविला. या हल्ल्यात भगवान गोहने गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे.
सदर घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला आहे. वाघाचा शोध घेण्यासाठी पथक रवाना करण्यात आले असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले.
#thegdv #gadchirolinews #gadchirolipolice #tigeratyack

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here