गडचिरोलीत माओवादी चळवळीला निर्णायक धक्का : पोलित ब्युरो सदस्य ‘भूपती’सह ६१ माओवादींचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या समोर आत्मसमर्पण

44

-५४ अग्निशस्त्रांसह शस्त्रास्त्रांचा सन्मानपूर्वक त्याग, शासनाच्या आत्मसमर्पण व पुनर्वसन धोरणाला अभूतपूर्व यश
The गडविश्व
गडचिरोली, दि. १५ : गडचिरोली जिल्ह्याच्या माओवादी इतिहासातील सर्वात मोठा आणि ऐतिहासिक दिवस आज नोंदवला गेला. सीपीआय (माओवादी) संघटनेचा पोलित ब्युरो सदस्य, केंद्रीय समिती सदस्य, प्रवक्ता आणि दंडकारण्य क्षेत्रीय सचिव मल्लोजुला वेनुगोपाल राव ऊर्फ भूपती ऊर्फ सोनू ऊर्फ विवेक या अत्यंत कुख्यात माओवादी नेत्यासह एकूण ६१ वरिष्ठ जहाल माओवादी सदस्यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री आणि गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर आत्मसमर्पण केले.
या आत्मसमर्पितांकडून ५४ अग्निशस्त्रे आणि माओवादी गणवेशासह आत्मसमर्पण करण्यात आले असून, शासनाने यांच्यावर एकत्रितपणे ५ कोटी २४ लाख रुपयांचे इनाम जाहीर केले होते.
आज, गडचिरोली पोलीस मुख्यालयातील शहीद पांडू आलाम सभागृहात पार पडलेल्या भव्य कार्यक्रमात आत्मसमर्पण सोहळा संपन्न झाला. या वेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी आत्मसमर्पित माओवाद्यांना लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात सामील होऊन सन्मानाने जगण्याचे आवाहन केले.
ते म्हणाले, “आजचा दिवस गडचिरोलीसाठी ऐतिहासिक आहे. हिंसेचा मार्ग सोडून शांततेकडे वळणाऱ्या सर्व आत्मसमर्पितांना शासनाचा आधार आहे. माओवादी चळवळ जवळपास संपुष्टात आली असून उर्वरितांनीही विकासाच्या प्रवाहात सामील व्हावे.”

पुनर्वसन निधीचे वितरण आणि बक्षीस घोषणा

आत्मसमर्पित माओवादी सदस्यांना एस.आर.ई. निधीतून एकूण ३ कोटी १ लाख ५५ हजार रुपयांचे धनादेश वितरित करण्यात आले.
यापूर्वी आत्मसमर्पण केलेल्या १७ माओवादी सदस्यांना प्रत्येकी २.५ लाख रुपयांचे धनादेश देण्यात आले.
तसेच, पती-पत्नीने आत्मसमर्पण केल्यास प्रत्येकी १.५ लाखांची अतिरिक्त मदत शासनाकडून मंजूर करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी गडचिरोली पोलीस दलाच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल एक कोटी रुपयांच्या बक्षिसाची घोषणा केली.

२०२५ मध्ये एकूण १०१ माओवादी आत्मसमर्पण

गडचिरोली पोलीस व सिआरपीएफ यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे २०२५ मध्ये आजपर्यंत १०१ माओवादी आत्मसमर्पण करून लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात आले आहेत. २००५ पासून आतापर्यंत ७२२ माओवादी आत्मसमर्पण करून शासनाच्या पुनर्वसन धोरणाचा लाभ घेत आहेत.

‘भूपती’चा आत्मसमर्पण – माओवादी संघटनेसाठी मोठा धक्का

मल्लोजुला वेनुगोपाल राव ऊर्फ ‘भूपती’ हा सीपीआय (माओवादी) च्या केंद्रीय समितीतील सर्वाधिक प्रभावशाली सदस्य होता.
त्याच्यासह २ डीकेएसझेडसी सदस्य, १० डिव्हिजन कमिटी सदस्य आणि ४९ अन्य माओवादींनी आज शस्त्रे खाली ठेवून शांततेचा मार्ग स्वीकारला.
हा आत्मसमर्पण सोहळा माओवादी संघटनेच्या कार्यपद्धतीसाठी आणि दंडकारण्य क्षेत्रातील त्यांच्या अस्तित्वासाठी निर्णायक धक्का मानला जात आहे.

आत्मसमर्पित माओवादी सदस्यांची संपूर्ण यादी

१) मल्लोजुला वेनुगोपाल राय ऊर्फ भूपती ऊर्फ सोनू ऊर्फ सोनुदादा ऊर्फ विवेक ऊर्फ लक्ष्मीराजन ऊर्फ लचन्ना ऊर्फ अभय
२) विवेक ऊर्फ भास्कर ऊर्फ उमेश ऊर्फ प्रकाश ऊर्फ महेश ऊर्फ विजय ऊर्फ सुरेंदर ऊर्फ बिरसा ऊर्फ रघु ईररी
३) स्वाती सायलु सलाकुला ऊर्फ सरोजा ऊर्फ लता ऊर्फ दिपा
४) शबीर ऊर्फ अर्जुन कोवा येमला
५) जीतरु ऊर्फ गंगु जोगा नुप्पो
६) दलसू ऊर्फ मैनु ऊर्फ जोगा पुसु गावडे
७) सागर ऊर्फ सुक्कु ऊर्फ बुच्चा लच्चा सिडाम
८) पद्मा ऊर्फ पार्वती होयाम
९) अंजू ऊर्फ स्नेहा ऊर्फ लिना ऊर्फ अरुणा ऊर्फ अंजम्मा पोचय्या चिंताकिदी
१०) रामदास ऊर्फ रामजी चन्ना गावडे
११) रविकुमार ऊर्फ मल्लेश ऊर्फ कुमार ऊर्फ रवि मुपलय्या मनुगाला
१२) राजु ऊर्फ कलमसाय ऊर्फ रमेश कुटके वेलादी
१३) निखील ऊर्फ राजेश ऊर्फ आयतु पांडू लेकामी
१४) नरसु ऊर्फ स्वरुपा बुच्चया मडावी
१५) विष्णू ऊर्फ मनु ऊर्फ सनकु उसेंडी
१६) सुक्रो ऊर्फ रामजी बुकालु येळदा
१७) सुरेश ऊर्फ नागेश कोहका तलांडे
१८) मधु ऊर्फ नवलसिंग मन्नू टेकाम
१९) रोशनी ऊर्फ हिराई सामसाय कुरचामी
२०) अनिता ऊर्फ मडे बंडी मडकामी
२१) घुगे ऊर्फ शंकरन्ना गुरका
२२) बिच्चेम ऊर्फ सन्नु आयतू कडीयाम
२३) मंगली सोमा कुंजाम
२४) सायबो ऊर्फ गिता दिवो पोड्याम
२५) कमलेश ऊर्फ नंदा जोगा नुप्पो
२६) रोहीत ऊर्फ शिवकुमार सुकलु टेकाम
२७) ज्योती ऊर्फ सुगुना गुड्डी मडकाम
२८) सुनिल ऊर्फ उंगा मंगलु कुंजाम
२९) निर्मला ऊर्फ उमेश्वरी राजु ताडामी
३०) प्रियंका ऊर्फ वसंती लालसु लेकामी
३१) रागो ऊर्फ शांती जग्गु मोहंदा
३२) अडमे ऊर्फ मैनी जोगा मडावी
३३) कोसा ऊर्फ रितेश हिडमा कोवासे
३४) मंगलु ऊर्फ लता जोगा वेलो
३५) निला ऊर्फ पोज्जे गंगा वेट्टी
३६) पायकी ऊर्फ शर्मीला सुक्कु कुंजाम
३७) मंजू ऊर्फ गंगी मासा कोवाची
३८) जुन्नी ऊर्फ नेरो रावजी नरोटी
३९) प्रगती ऊर्फ कमला आयतू ताती
४०) अंजली ऊर्फ दुल्ले लच्छु कुंजाम
४१) गंगा ऊर्फ लोचन सोमलु मडकाम
४२) भिमा ऊर्फ पारमु सोना सोडी
४३) सुनिता ऊर्फ फुलबत्ती सुजन होळी
४४) रजीता पोयाम
४५) रंजू ऊर्फ गुंजी मल्ला पोयाम
४६) भुमे ऊर्फ लच्छी जागा मडकामी
४७) रीता ऊर्फ देवे पांडू कुंजाम
४८) अमोल ऊर्फ समरु बंडी सोडी
४९) ज्योती ऊर्फ अनुषा सन्ना मुचाकी
५०) अंकीता ऊर्फ मंजू उंगा हलामी
५१) मंजुला ऊर्फ रामे जोगा कुंजामी
५२) उंगी ऊर्फ संध्या देवे कुंजाम
५३) बलदेव ऊर्फ लकमा हुर्रा कुंजाम
५४) भुज्जी ऊर्फ अस्मीता दसरु येमला
५५) पैको ऊर्फ रवी बदरु ऊईका
५६) आसमान ऊर्फ रामु हिडमा काराम
५७) महेश ऊर्फ मंगेल उंगा तेलाम
५८) हुराल ऊर्फ सुनिल ऊर्फ अनेश कोपा कोवासे
५९) रामबत्ती मडल तेलामी
६०) सवी कुम्मा तुमरेटी
६१) भिमे ऊर्फ शर्मीला भिमा मडकामी

१२ पती-पत्नी जोडप्यांचे एकत्र आत्मसमर्पण

या आत्मसमर्पितांपैकी खालील १२ जोडप्यांनी पती-पत्नी म्हणून एकत्रितपणे शस्त्र खाली ठेवले:

१) विवेक ऊर्फ भास्कर ईररी व स्वाती सायलु सलाकुला
२) रविकुमार मनुगाला व पद्मा होयाम
३) रामदास गावडे व ज्योती मडकाम
४) बिच्चेम कडीयाम व मंगली कुंजाम
५) कमलेश नुप्पो व मंजुला कुंजामी
६) आसमान हिडमा व अंकीता हलामी
७) बलदेव कुंजाम व ज्योती मुचाकी
८) शबीर येमला व मंगलु वेलो
९) जीतरु नुप्पो व निला वेट्टी
१०) रोहीत टेकाम व सायबो पोड्याम
११) निखील लेकामी व निर्मला ताडामी
१२) दलसू गावडे व जुन्नी नरोटी

पोलीस व शासनाच्या प्रयत्नांना यश

गडचिरोली पोलीस दल, सीआरपीएफ, आणि शासनाच्या आत्मसमर्पण व पुनर्वसन धोरणाच्या सातत्यपूर्ण अंमलबजावणीमुळे गडचिरोली जिल्हा “माओवादींपासून मुक्तीकडे” वाटचाल करीत आहे.
सन २०२२ ते २०२५ दरम्यान एकूण १३४ माओवादी आत्मसमर्पण करून शांततेचा मार्ग स्वीकारला आहे.

#thegdv #thegadvishva #gadchiroinew #gadchiroiplice #Gadchiroli #MaoistSurrender #DevendraFadnavis #NaxalRehabilitation #PoliceSuccess #MaharashtraGovernment #Bhupati #CPImaoist

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here