The गडविश्व
गडचिरोली : दरवर्षी महाशिवरात्री निमित्त विदर्भाची काशी अशी ओळख असलेल्या मार्कंडादेव येथे यात्र भरत असते. या यात्रेत लाखोंच्या वर भावीक येत असतात. कोरानामुळे मागील वर्षी यात्रा रद्द करण्यात आली होती. आता मात्र कोरोनाचा प्रसार कमी होत असल्याने जिल्हा प्रशासनाने यंदा यात्रा भरविण्यास परवानगी दिली आहे. या यात्रेकरिता भाविकांच्या सेवेत एसटी सज्ज झाली आहे.
गडचिरोली जिल्हातील चामोर्शी तालुक्यातील मार्कंडादेव येथे महाशिवरात्री निमित्त यात्रा भरते. यंदा कोरोनाचा प्रभाव कमी असल्याने जिल्हा प्रशासनाने यात्रा भरविण्यास परवानगी दिली आहे. मात्र एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे तर काही कर्मचारी सेवेत रूजु झाले आहे, काही प्रमाणास एसटी सुरू आहे. त्यामुळे यंदा यात्रा तर भरणार मात्र यात्रेत जाण्याकरिता एसटीसी सेवा असणार काय असा प्रश्न भाविकांमध्ये होता. आता या प्रश्नाला पुर्णविराम आला आहे. कारण एसटी प्रशासन यात्रेसाठी सेवा देण्यास सज्ज झाले आहे. मार्कंडादेव यात्रेच्या माध्यमातून भाविकांना सेवा देण्याबरोबरच चांगले उत्पन्न मिळविण्याची संधी एसटील प्राप्त होत असल्याने जास्तीत जास्त बसफेऱ्या सोडण्याच्या दृष्टीने एसटीने नियोजन केले आहे.
एसटीच्या वतीने प्रवाशांसाठी गडचिरोली बसस्थानक, चामोर्शी मार्ग, चामोर्शी बसस्थानक, मार्कंडादेव, आष्टी, चपराळा व सावली तालुक्यातील साखरी घाटावर तात्पुरते मंडप उभारले जाणार आहे.
