भीषण अपघात : भरधाव कार ५० फुट खोल नदीपात्रात कोसळली

1475

– उमरेड येथील हॉटेल मालकाचा मृत्यू
The गडविश्व
भिवापूर, दि. २५ : श्रावणमासाची सांगता झाल्यानंतर हॉटेल सुरू करण्यापूर्वी मासे आणण्यासाठी गेलेल्या उमरेड येथील हॉटेल मालकाचा भीषण अपघातात मृत्यू झाला. रविवारी सकाळी सुमारे ८ वाजता भंडारा जिल्ह्यातील पवनी परिसरातील राष्ट्रीय महामार्गावरील मरूनदी पुलावर हा अपघात झाला.
मृताचे नाव सागर मधूकर वाघमारे (३०, रा. उमरेड) असे असून तो राष्ट्रीय महामार्गावरील उमरेड येथे हॉटेल व्यवसाय करत होता. मिळालेल्या माहितीनुसार, सागर रविवारी पहाटे टाटा हॅरिअर कार (क्र. एमएच ४० सीएक्स ७९२६) ने मासे आणण्यासाठी पवनीला गेला होता. परतीच्या प्रवासात वेगावरील नियंत्रण सुटल्याने त्याची कार वळणावरून थेट पुलावरील सुरक्षाकवच तोडत अंदाजे ५० फुट खोल नदीपात्रात कोसळली. पाण्यामुळे तो घटनास्थळीच बुडाला.
घटनेची माहिती मिळताच पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने प्रथम मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यानंतर जेसीबी व क्रेनच्या सहाय्याने पाण्यात बुडालेली कार बाहेर काढण्यात आली. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आला.
भरधाव हॅरिअर कारने राष्ट्रीय महामार्गावरील वळणावर सुरक्षेसाठी ठेवलेले लोखंडी ड्रम आणि पुलावरील लोखंडी कठडे तोडले. यामुळे अपघाताच्या वेळी कारचा वेग किती प्रचंड होता, याचा अंदाज येतो. मृतदेह बाहेर काढल्यानंतर सागरच्या डोक्यावर किरकोळ जखम आढळली, मात्र मृत्यू हा पाण्यात बुडल्यामुळे झाल्याचे बोलले जात आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #accident #latestnews #breakingnews #latestnews

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here